लोणी काळभोर (वार्ताहर) – कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, वाघोली, मांजरी बुद्रुकसह हवेली तालुक्यातील आठ ठिकाणचा कंटेन्मेट झोन (प्रतीबंधीत क्षेत्र) शनिवार (दि. 6) पासून हटविण्यात आला आहे. यामुळे वरील आठ गावात दुकाने, खासगी कार्यालय व व्यापारी दुकाने सकाळी नऊ ते सांयकाळी पाच या दरम्यान सुरू ठेवण्यास परवानगी असल्याची माहिती हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी दिली.
करोनाचे रुग्ण आढळून आल्याने मागील 28 दिवसांपूर्वी फुरसुंगी गावठाण, हांडेवाडी गावठाण, कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा-गाढवेमळा, वाघोली ग्रामपंचायत हद्दीतील केसनंद-जोगेश्वरी रस्ता-सुगुरु पार्क, भिलारवाडी, खानापूर, मांजरी बुद्रुक हद्दीतील झेड कॉर्नर व कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीमाळवाडी अशा आठ ठिकाणे कंटेन्मेट झोन (प्रतीबंधीत क्षेत्र) म्हणून जाहीर केली होती. मात्र,वरील आठही ठिकाणचे रुग्ण पूर्णपणे बरे होऊन, घरी परतल्याने शनिवारपासून वरील आठ ठिकाणचे प्रतिबंधीत क्षेत्र हटविण्यात आले आहे.
सध्याची सुक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्रे
मांजरी बुद्रुक (महादेवनगर, गोडबोलेवस्ती, भंडलकरनगर, अनाजी वस्ती, घुले वस्ती, म्हसोबा वस्ती, भापकर मळा, गोपाळपट्टी- टिळेकर कॉलनी), वाघोली (आव्हाळवाडी रोडवरील गणेशनगर, झेड रेसिडेन्सी, गणेशनगर, बायफ रस्ता, धुत कंपनी परीसर, उबाळेनगर), नऱ्हे (गोकुळनगर, नवदिप सोसायटी ते देवश्री कोम्पलेक्स, कंजारवस्ती कृष्णाईनगर
सिध्दीविनायक अंगण सोसायटी), वाघोली (गणेशपार्क कावडेवाडी), बकोरी (प्रिस्टीन सिटी), मांजरी बुद्रुक (शिवजन्य सोसायटी), कदमवाकवस्ती (स्वामी विवेकानंद नगर, चांदने वस्ती), आंळंदी म्हातोबाची (पानमळा), पिसोळी (गगणनगर), मांजरी खुर्द (पवार वस्ती), कोरेगाव मुळ (गावठाण), होळकरवाडी (झांबरे वस्ती-तुपे प्लॉटींग), कोंढवे-धावडे )खडकबाग एनडीए गेटसमोर) व शिंदेवाडी-जगतापवाडी.