पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मृतदेहांची वाहतूक खासगी रुग्णवाहिका करत नाहीत. या पार्श्वभूमीवर पीएमपीएल आणि पालिका प्रशासनाने आठ शववाहिका कार्यरत ठेवल्या असून मदतीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
पीएमपीएलकडून आपल्या ताफ्यातील 4 पुष्पक व्हॅन आणि महापालिका प्रशासनाकडून 4 शववाहिका आहेत. शहरात दिवसेंदिवस करोना रूग्णांची संख्या वाढत आहे, त्यात अनेक करोना बाधित रूग्णांची रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांचे मृत्यू होत आहेत, अशा मृतदेहांची वाहतूक करण्यासाठी अनेक खासगी रुग्णवाहिका चालक घाबरत आहेत.
मात्र, पीएमपीच्या पुष्पक व्हॅनच्या चालकांकडून करोनाच्या मृतदेहांची वाहतूक करण्यात येत आहे. मागील पाच दिवसात पीएमपीच्या पुष्पक व्हॅनमार्फत 17 करोना मृतदेहांची वाहतूक करण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने चालकाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा कीट दिले आहे.