पाकिस्तानातील पुरात आठ जणांचे बळी

पेशावर – पाकिस्तानातील उत्तरपश्‍चिम प्रांतात अचानक आलेल्या पुरात किमान आठ जण दगावल्याचे वृत्त आहे. हा भाग अफगाण सीमेला लागून आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून अन्य सहा मुले बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते. या भागात अचानक मोठा पाऊस झाला. त्यात नद्यानाल्यांना मोठा पुर आला. या पुराचा फटका लग्नासाठी एक वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या वाहनाला बसला. हे वाहनच त्या पुरात वाहून गेल्याने त्यातील आठ जण ठार झाले तर अन्य सहा जण बेपत्ता झाले आहेत. लष्कराचे मदत पथक तिथे पोहचले असून त्यांनी बेपत्ता मुलांचा शोध सुरू केला आहे.ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामामुळे या भागात असा हा मोठा अवकाळी पाऊस झाल्याचे सांगण्यात येते.पाकिस्तानलाच अशा पुराचा भविष्यात मोठा धोका संभवत असल्याचे एका अहवालात नमूद. डोंगराळ भागातील सुमारे एक कोटी दहा लाख लोक या पुराच्या संभाव्य आपत्तीत सापडू शकतात असेही निरीक्षण एका अहवालात नोंदवण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.