Big Accident: ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन ट्रकच्या मध्ये दबली कार, आठ जणांना जागीच मृत्यू

छत्तीसगढ – हरियाणातील बहादुरगडमध्ये पहाटे चार वाजता भीषण अपघात घडला. अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात मागिल आणि पुढील दोन्ही ट्रकच्या मध्ये कार दबून हा अपघात घडला. ही घटना फरूखनगरजवळ घडली. कारमध्ये नऊ लोक होते. त्यातील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एका मुलीचा जीव वाचला आहे. मृतांमध्ये चार पुरूष, तीन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

गोगा मेडीचे दर्शन करून परतत होते कुटुंबीय

अपघातात मृत्यू पावलेले लोक हे उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील अनूप नंगला येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. ते राजस्थान येथील गोगा मेडीचे दर्शन करून घरी परतत होते. तीन तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी मृतदेह गाडीतून बाहेर काढले. बचावलेल्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तीनही वाहने ताब्यात घेतली असून अपघाताची चौकशी करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.