खुनाच्या गुन्ह्यात चार तृतीयपंथींसह आठजण अटकेत

नगर  – पैसे न दिल्याच्या कारणावरून तृतीथपंथींनी त्यांच्या साथीदारासह एकरुखे (ता. राहाता) येथे गावात जाऊन दोघांना जबर मारहाण केली. त्यात एकाचा उपचारादमरम्यान मृत्यू झाला. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चार तृतीयपंथींसह आठजणांना अटक केली.

सचिन उत्तम जाधव उर्फ संचिता तमन्ना पवार, विकास दशरथ धनवडे उर्फ रूपाली सलोनी शेख, आनंद फौजी शेलार उर्फ रूचिरा सलोनी शेख (सर्व रा. सुभाष कॉलनी, श्रीरामपूर), लक्ष्मण शंकर वायकर उर्फ लक्ष्मी सलोनी शेख (रा. इंदिरानगर, कोपरगाव), अभिजित उर्फ गोट्या बाळू पवार, गौरव उर्फ सनी भागवत पवार, अरबाज सत्तार शेख (तिघे रा. खंडाळा श्रीरामपूर) असे त्यांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी, दिलीप आभाळे व त्यांचे मित्र निवृत्ती उर्फ नंदू चांगदेव क्षीरसागर दोघे 5 सप्टेंबर 2021 रोजी गणेशनगर येथून पेट्रोल भरण्यासाठी जात असताना गणेशनगर फाटा येथे काही तृतीयपंथीयांनी त्यांना अवडवून पैशाची मागणी केली. त्यावरून तृतीयपंथी आणि दिलीप आभाळे यांच्यामध्ये वाद झाला.

त्याचा राग मनात धरून तृतीयपंथीयांनी त्याच दिवशी साथीदारांसह एकरूखे गावात जावून वरील दोघांना लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण केली. त्यात महेश आभाळे यांचे वडील दिलीप आभाळे यांचा उपचारादरम्यान 16 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला.

याबाबत राहाता पोलीस ठाण्यात महेश आभाळे यांच्या फिर्यादीवरून सचिन उत्तम जाधव उर्फ संचिता तमन्ना पवार याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना सचिन जाधव याच्याबद्दल माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने एकरूखे गावात जाऊन त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे कसून चौकशी केली असता अन्य आरोपींची नावे समोर आली. पोलिसांनी तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे त्यांना विविध ठिकाणावरून ताब्यात घेतले. वरील आरोपींचा अन्य एक साथीदार पसार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस कर्मचारी मन्सूर सय्यद, भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, मनोहर गोसावी, शंकर चौधरी, दिलीप शिंदे, रवी सोनटक्के, संतोष लोंढे यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.