सातारा – कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील आठ जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. त्यामध्ये रुग्णालयाच्या पाच परिचारिकांचा व एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येने अर्धशतक ओलांडले असून हही संख्या आता ५२ झाली आहे.
सातारा जिल्ह्यात रात्री उशिरा पॉझिटिव्ह रुग्णाचे निकट सहवासातील ८ जणांना (कोविड -19) करोनाची बाधा झाल्याचा रिपोर्ट आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ५२ वर पोहचली आहे. या आठ रुग्णांमध्ये कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात ील पाच परिचारिका व एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.