डॉक्‍टरच्या बंगल्यात दरोडा टाकल्याप्रकरणात आठ जणांना जामीन

पुणे  – डॉक्‍टरच्या बंगल्यात खिडकीद्वारे प्रवेश करून त्यांना आणि पत्नीला चाकुचा धाक दाखवून हातपाय बांधून 66 लाख 77 हजार 500 रुपयांचा दरोडा टाकल्याप्रकरणात आठ जणांना सत्र न्यायाधीश जे.एन.राजे यांनी जामीन मंजुर केला.

लोणावळा येथील प्रसिध्द बालरोग तज्ज्ञ डॉ. हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल यांच्या बंगल्यात हा दरोडा टाकण्यात आला होता. त्यांनीच याबाबत लोणावळा पोलिसात फिर्याद दिली आहे.
सर्वांना खोट्या गुन्ह्यात अडकाविण्यात आले आहे. त्यांना दोषी समजण्याएवढे काहीही जप्त करण्यात आलेले नाही.

तपासातही त्यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचा ठोस पुरावा मिळालेला नाही. तीन महिन्याहून अधिक काळापासून ते तुरूंगात आहेत. तपास पूर्ण झालेला आहे. त्यामुळे जामीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली. बचाव पक्षातर्फे ऍड. अभय सिरसाट, ऍड. विजयसिंह निकम, ऍड. राजेंद्र गाडे पाटील, ऍड. वाहिद मणियार आणि कोतवाल यांनी काम पाहिले.

सुनील शंकर शेजवळ, संजय भगवान शेडगे, मुकेश रमेश राठोड, दिनेश जयराम आहिरे, शामसुंदर विश्‍वनाथ शर्मा, सागर रमेश धोत्रे, विकास शंकर गुरव आणि रवींद्र काशिराम पवार या आठ जणांना जामीन देण्यात आला आहे.

या प्रकरणात एकुण 22 जणांवर गुन्हा दाखल आहे. याशिवाय दोन अल्पवयीन मुलांचाही गुन्ह्यात समावेश आहे. ही घटना 17 जून 2021 रोजी लोणावळा येथील खंडेलवाल रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील बंग़ल्यात घडली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.