पुणे – ‘पुणे फिल्म फाऊंडेशन’ आणि “महाराष्ट्र सरकार’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 21 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफ) विविध सत्रांमध्ये राहुल रवैल, अरुणा राजे, जॉनी लिव्हर, विद्या बालन सहभागी होणार आहेत. स्पर्धात्मक विभागातील सात मराठी चित्रपटांची घोषणा महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सोमवारी केली.
यंदा दि. 2 ते 9 फेब्रुवारी दरम्यान “पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून, मुकुंदनगर येथील थिएटर अकादमीच्या सकल ललित कलाघर येथे दि. 2 फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजता महोत्सवाचो उद्घाटन उद्घाटन समारंभ होणार आहे. इराणचे अली अब्बासी दिग्दर्शित “होली स्पायडर’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरूवात होणार आहे. तर, 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता महोत्सवाचा समारोप होणार आहे.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संकल्पना “पीफ’मध्येही देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या अमृतमहोत्सवी वर्षाची संकल्पना “पीफ’मध्येही उमटणार आहे. गेल्या 75 वर्षांतील चित्रपटांचा पटही यानिमित्ताने उलगडला जाणार आहे. तसेच गेल्या 75 वर्षांतील दिग्गज कलकारांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.
काही तांत्रिक कारणामुळे यंदा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात महोत्सवातील चित्रपट दाखवण्यात येणार नाहीत. त्या ऐवजी लष्कर परिसरातील आयनॉक्स या ठिकाणी आणखी एक पडदा वाढवण्यात आला आहे.
– डॉ. जब्बार पटेल, संचालक, पुणे आंतरराष्टूीय चित्रपट महोत्सव
स्पर्धात्मक विभागात निवड झालेले मराठी चित्रपट
मदार (दिग्दर्शक – मंगेश बदार)
ग्लोबल आडगांव (दिग्दर्शक – अनिल कुमार साळवे)
गिरकी (दिग्दर्शक – कविता दातीर व अमित सोनावणे)
टेरेटरी (दिग्दर्शक – सचिन मुल्लेम्वार)
डायरी ऑफ विनायक पंडित (दिग्दर्शक – मयूर करंबळीकर)
धर्मवीर; मुक्कम पोस्ट ठाणे (दिग्दर्शक – प्रवीण तरडे)
पंचक (दिग्दर्शक – जयंत जठार व राहुल आवटे)
व्याख्याने, कार्यशाळा आणि चर्चासत्र
(स्थळ – पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन)
दी इंव्हिजिबल आर्ट ऑफ फिल्म एडिटिंग’, वक्ते – ए. श्रीकर प्रसाद (3 फेब्रुवारी)
विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यानमाला,
लेसन्स आय हॅव लर्न्ट सो फार’, वक्ते – चैतन्य ताम्हाणे (4 फेब्रुवारी)
थिंकिंग इमेजेस’, वक्ते – शाजी करून (5 फेब्रुवारी)
मास्टरक्लास, मेनस्ट्रीम सिनेमा टूडे’, वक्ते – राहुल रवैल (6 फेब्रुवारी)
ह्युमर इन सिनेमा’ वक्ते – जॉनी लिव्हर (7 फेब्रुवारी)
मेकिंग फिल्म्स अँड वॉचिंग फिल्म्स: जेंडर इन हिंदी सिनेमा’, वक्त्या – अरुणा राजे,
डॉ. लक्ष्मी लिंगम (8 फेब्रुवारी)
चॅलेंजेस ऑफ फिमेल ऍक्टर्स इन दी एन्टरटेन्मेट वर्ल्ड’, वक्ते – विद्या बालन (8 फेब्रुवारी)