लातूर – लातूर शहराजवळ शनिवारी झालेल्या एका मोठ्या रस्ता अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. लातूर अंबाजोगाई रस्त्यावरील सायगावजवळ ट्रक आणि क्रुझर वाहनाची धडक झाल्याने ही घटना घडली. या अपघातात अन्य अकरा जण गंभीर जखमी झाले आहेत.
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रस्तावर क्रुझर जीप आणि भरधाव वेगाने येणारा ट्रक यांच्यात धडक होऊन हा अपघात घडला. या मार्गावर वाहने नेहमीच सुसाट धावत असतात. त्यात वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जादा प्रवासी भरले जात असल्याने या वाहनाच्या वेगावर चालकाचे नियंत्रण राहात नाही.
त्यातून त्या मार्गावर हे प्रकार घडत आहेत. या अपघातात मरण पावलेल्यांची ओळख पटली आहे. मात्र अपघाताबाबतचा अन्य तपशील मिळायचा आहे.