काठमांडु – नेपाळ मधील एका रिसॉर्ट मध्ये झालेल्या गॅस गळतीच्या प्रकारामुळे आठ भारतीय पर्यटकांना आपला प्राण गमवावा लागल्याची घटना घडली आहे. त्यात चार लहान मुलांचा समावेश आहे. गॅस गळतीमुळे हे आठ पर्यटक बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना विशेष विमानाने एचएएमएस रूग्णालयात नेण्यात आले पण तत्पुर्वीच ते मरण पावल्याचे रूग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
मृतांमध्ये दोन दाम्पत्ये आणि त्यांच्या चार लहान मुलांचा समावेश आहे. ते केरळातील पोखरा गावचे रहिवासी होते. नेपाळ मध्ये ते पर्यटनासाठी आले होते. मकवानपुर येथील एव्हरेस्ट पॅनारोमा रिसॉर्ट मध्ये ते परतीच्या प्रवासात मुक्कामासाठी थांबले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या खोलीतील वातावरण गरम ठेवण्यासाठी गॅस हिटर चालू केला होता. त्यातून हा प्रकार घडला असे रिसॉर्टच्या मालकांनी सांगितले.
या कुटुंबियांना आपल्या खोलीचे सगळ दरवाजे आणि खिडक्या आतून बंद केल्या होत्या. त्यामुळे घुसमटून त्यांचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा कयास आहे.