164 नवीन रुग्णांची नोंद : 142 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात आज नवीन 164 रुग्णांची नोंद झाली. तर आठ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरात आतापर्यंत लागण झालेल्या रुग्णांची संख्या 90289 इतकी झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवारी चार वाजेपर्यंत शहरातील 164 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. आज दिवसभरात 8 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 5 व शहराबाहेरील 3 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरामध्ये 90289 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1237 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये शहराबाहेरील 655 जणांचा समावेश आहे.
शहरातील पिंपरी, कासारवाडी, वाकड, काळेवाडी, भोसरी येथील पाच रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील आंबेगाव, राजगुरूनगर, खेड येथील तीन रुग्णांचा मृत्यू झाला.
दिवसभरात 142 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 86998 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2529 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांतील 927 जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.