शहरात यंदा साडेआठ हजार पोलीस

पुणे -वैभवशाली गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक गुरुवारी सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार आहे. ही मिरवणूक शांततेत व विनाअडथळा पार पडावी, यासाठी तब्बल साडेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिरवणुकीच्या प्रमुख 39 मार्गांवर 169 सीसीटीव्हीवरून नजर ठेवली जाणार आहे. त्याच बरोबर बॉम्ब शोधक-नाशक पथक, छेडछाड व चोरीविरोधी पथकही तैनात केले जाणार आहे. शहरामध्ये 2 हजार गणेश मंडळे आहेत. त्यापैकी 600 मंडळे मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर सहभागी होणार आहेत. काश्‍मीरमधील 370 कलम हटवल्यावर देशभरात “हाय अलर्ट’ देण्यात आला होता. त्या पार्श्‍वभूमीवर यंदाची मिरवणूक पार पडत आहे. पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही प्रशिक्षण दिले आहे.

मिरवणूक बंदोबस्तात 4 अतिरिक्त आयुक्त, 12 उपायुक्त, 29 सहायक आयुक्त, 150 पोलीस निरीक्षक, 461 उपनिरीक्षक या अधिकाऱ्यांसह 7 हजार 457 कर्मचारी सहभागी असणार आहेत. एसआरपीएफ 2 कंपन्या आणि 293 होमगार्डही तैनात असणार आहेत. पाच जलद प्रतिसाद पथके, पाच दंगल नियंत्रण पथके, लिमा, वज्र, वरून, ही दंगल रोधक पथक संवेदनशील ठिकाणांची तपासणी करण्यासाठी मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर बॉम्ब शोधक-नाशक पथक (बीडीडीएस) ताथ पथके तैनात केली जाणार आहेत. या प्रत्येक एका पथकासोबत प्रशिक्षित श्‍वानदेखील राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

क्वार्टर गेट-बेलबाग चौक मार्गावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बंदोबस्त
लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, कर्वे रस्ता आणि लष्कर भागातील रस्ता या सहा मार्गांसाठी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. सर्व बंदोबस्तांचे देखरेख अधिकारी म्हणून सह आयुक्त रविंद्र शिसवे असतील. अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे-टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, बेलबाग चौक आणि संपूर्ण लक्ष्मीरस्ता बंदोबस्त अधिकारी असतील. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) सुनील फुलारी परिमंडळ -3 आणि 4च्या बंदोबस्तावर असतील. हा बंदोबस्त संपल्यावर टिळक चौक ते नटराज विसर्जन घाट दरम्यान बंदोबस्तावर असतील. अपर पोलीस पोलीस आयुक्त अशोक मोराळे अलका टॉकिज चौक बंदोबस्त अधिकारी असतील, तर अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. संजय शिंदे परिमंडळ-2मधील बंदोबस्ताचे देखरेख अधिकारी आणि त्यानंतर टिळक चौक, शास्त्री रोड व एसएम जोशी विसर्जन घाट देखरेख अधिकारी म्हणून काम पाहतील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)