पीएफ खात्यांमध्ये साडेआठ कोटी जमा

बारामती (प्रतिनिधी) – बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील जनावर बाजार गुरुवारपासून (दि. 28) सुरू करण्यास जिल्हा उपनिबंधकांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार गुरुवारपासून जळोची बाजार समितीच्या आवारातील जनावर बाजार सुरू होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

तोंडावर आलेला खरीप हंगाम लक्षात घेता शेतीची कामे व पशुधनाची खरेदी विक्री सुरू होणे आवश्यक आहे. ज्या बाजार समित्यांमध्ये जनावरांचे नियमित बाजार भरविले जातात, मात्र करोनामुळे त्यामध्ये खंड पडला आहे, अशा बाजार समित्यांनी करोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करून व गर्दी होऊ न देता जनावरांचे बाजार त्वरित सुरू करावेत, असे याबाबतच्या जिल्हा उपनिबंधकांनी पत्राद्वारे कळविले आहे.

जिल्हा उपनिबंधकांच्या या पत्राची दखल घेत बाजार समितीने जनावरांचा बाजार गुरुवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रत्येकाने मास्कचा वापर करणे अनिवार्य असून, शारीरिक अंतर पाळणे, सातत्याने सॅनिटायझरचा वापर करणे, सार्वजनिक स्वच्छता राखणे, यांचे बंधन सर्वांवर घालण्यात आले आहे. गर्दी होऊ नये, यासाठीही आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. बाजारात येणाऱ्यांनीही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.