कैरो/ लक्सार, दि. 11 – इजिप्तमध्ये तब्बल 3 हजार वर्षांपूर्वीचे शहर सापडल्याचा दावा पुरातत्त्व संशोधकांनी केला आहे. हे ठिकाण लक्सार या राजघराण्याशी संबंधित ठिकाणापासून जवळ आहे. उत्खनन करणाऱ्या कारागिरांनी पुरातन वास्तूंचे अवशेष, भांडी आणि प्राण्यांचे अवशेष काळजीपूर्वक उत्खनन करून बाहेर काढले आहेत. या उत्खनाची माहिती मिळाल्यावर लक्सारमध्ये माध्यम मोठी प्रगती केली आहे आहे.
इजिप्तमधील सर्वात मोठे हरवलेले शहर आहे. ऍटन देवता आणि अमेंहोटेप तिसरा त्यांच्याशी या शहराचा संबंध आहे. असे इजिप्तमधील प्रख्यात पुरातत्व संशोधक झाही हवास यांनी पत्रकारांना सांगितले.
एकूण तीन मोठे जिल्हे सापडले आहेत. त्यापैकी एक प्रशासकीय कामासाठी, एक कामगारांच्या विश्रांतीसाठी आणि एक उद्योगांसाठी आहे. मास वाळवण्यासाठी, कपडे शिवण्यासाठी लहान पुतळे बनवण्यासाठीच्या कार्यशाळाही येथे आहेत. हे ठिकाण केवळ इमारतींपुरते मर्यादित नाही, असे ईजिप्तच्या पुरातन वास्तु विषयक सर्वोच्च परिषदेचे प्रमुख मुस्तफा वजिरी यांनी सांगितले. या ठिकाणी आर्थिक व्यवहार, कार्यशाळा आणि अन्न शिजवण्याची प्रक्रिया ही चालत असत, असे दिसते असल्याचे असे ते म्हणाले.
हे शहर म्हणजे हरवलेले सोन्याचे शहर आहे असे हवास यांनी या आठवड्याच्या प्रारंभी जाहीर केले होते. इजिप्तमध्ये आतापर्यंत एवढे मोठे शहर सापडले नव्हते, असेही पुरातत्व पथकाने म्हटले आहे. आतापर्यंत या शहराचा काही भागच उत्खननातून बाहेर काढला आहे. शहराची व्याप्ती दक्षिणेपासून उत्तरे पर्यंत पसरलेली आहे. या शहराच्या उत्खननाला गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये रामसेस तिसरा आणि ऍमेनहोटेप तिसरा यांच्या मंदिरापासून सुरुवात करण्यात आली होती. हे ठिकाण कैरोच्या दक्षिणेला पाचशे किलोमीटर अंतरावर आहे.
ऍमेनहोटेप तिसरा यांने आधुनिक इराक आणि सीरिया यांच्या जवळच्या युफ्रेटिस नदीच्या किनारी चार दशके राज्य केले होते. या राजाचा कालखंड ख्रिस्तपूर्व 1354 सालापर्यंत होता. त्या काळातील दागिने आणि रंगवलेली भांडी, ताबीज, मातीच्या विटा आदी सर्व उत्खननात सापडले आहे. हे त्या काळातील सोन्याने मढवलेला मासाही सापडला आहे. मंदिर आणि प्रार्थना स्थळांचे शिखर अशा वास्तु सापडल्या असल्याने त्या काळात धार्मिक स्थळांची रचना कशी होती ते समजते.
2011 मध्ये झालेल्या अरब उठावानंतर इजिप्तमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्याचा फटका पर्यटन उद्योगाला बसला. आता इजिप्तमध्ये पर्यटकांना आकर्षित केले जात आहे. हे पुरातन वस्तू आणि पुरातन वारसा असलेल्या ठिकाणांना पर्यटक आवर्जून भेट देतील अशी अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात पुरातन काळातील 18 राजे आणि चार राण्यांच्या ममी इजिप्तच्या संग्रहालयातून बाहेर काढून इजिप्तच्या ऐतिहासिक तहरीर चौकात मिरवणुकीने आणण्यात आल्या. या मिरवणूकीचा उद्देश पर्यटकांना आकर्षित करणे हाच होता.