उन्हाच्या कडाक्‍यात अंडी नकोच

तब्बल 15 लाख नगांनी आवक घटली : भावही उतरले
सोलापूरसह आंध्र प्रदेशातून होते आवक

पुणे –
उन्हाच्या कडाक्‍यामुळे पुणेकरांनी अंडी खाण्याचा हात आवरता घेतला आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून शहरातील अंडी विक्रीमध्ये मोठी घट झाली आहे. त्यातच ग्रामीण भागातही खप खाली आला आहे. मागणी अभावी अंड्यांच्या बाजारात मंदीचे वातावरण आहे.

दूध आणि अंडी हे पूर्ण अन्न मानले जाते. गुलाबी थंडीच्या चाहुलीने महाग होणारी अंडी सध्या उन्हाच्या झळा बसू लागताच स्वस्त झाली आहेत. वाढत्या तापमानामुळे अंड्यांचा खप कमी झाल्याने भावही घसरले आहेत. एरवी दररोज सुमारे 50 लाख अंड्यांचा पुरवठा होणाऱ्या पुणे शहरात सध्या 30 ते 35 लाख अंड्यांचाच पुरवठा होत आहे. महाराष्ट्रात सातारा, सोलापूर, हैद्राबाद तसेच आंध्र प्रदेशातील अन्य भागांतून अंडी बाजारात दाखल होत आहे. उत्पादन भागातील अंड्याचे तापमान वाढल्यामुळे उत्पादन कमी होण्यास सुरूवात होते. याच कालावधीत मागणीचीही कमी होत असल्याने अंड्याचा प्रतिनग दर एक रुपयांने कमी झाला आहे. एरवी 5 रुपये 50 पैशांना मिळणारे अंडे आता 4 रुपये 50 पैसे दराने किरकोळ बाजारात विकले जात असल्याची माहिती व्यापारी रुपेश परदेशी यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.