Sheikh Hasina – बांगलादेशातील माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारतातून मायदेशी परत आणण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला जाईल, असे बांगलादेशातील हंगामी सरकारने म्हटले आहे.
जर भारताने हसीना यांना परत पाठवण्यास नकार दिला तर ते बांगलादेश आणि भारत यांच्यातील प्रत्यार्पण कराराचे उल्लंघन ठरेल, असे कायदा सल्लागार आसिफ नजरुल यांनी सचिवालयात पत्रकारांना सांगितले.
गेल् वर्षी विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर शेख हसीना यांनी बांगलादेशातून पलायन करून भारतात आश्रय घेतला होता. तेंव्हापासून त्या भारताच्याच आश्रयाला आहेत.
बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने हसीना आणि त्यांच्या तत्कालिन मंत्रिमंडळातील अनेक माजी मंत्री, सल्लागार आणि लष्करी आणि नागरी अधिकाऱ्यांविरुद्ध मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी आणि नरसंहारासाठी अटक वॉरंट जारी केले आहे.
गेल्या वर्षी, बांगलादेशाने बारताला एक राजनैतिक पत्र पाठवून हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. भारताने मात्र हसीना यांना परत पाठवले जाणार नाही, हे स्पष्ट केले आहे.