शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्यासाठी प्रयत्न

नाबार्डकडून सहकारी व ग्रामीण बॅंकांना 12 हजार कोटी रुपये

पुणे  – सध्या रब्बीची कापणी सुरू आहे. त्याचबरोबर खरिपाची मशागत करण्याचे काम सुरू आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा व्हावा याकरिता राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंक म्हणजे नाबार्डने प्रयत्न सुरू केले आहेत. नाबार्डने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी सहकारी बॅंका आणि विभागीय ग्रामीण बॅंकांना 12 हजार कोटी रुपयांचा वित्त पुरवठा केल्याचे नाबार्डने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

नाबार्डने केलेला वित्तपुरवठा हा 4.8 टक्के व्याजावर केला आहे. या आठवड्यात हा वित्तपुरवठा केला आहे. रब्बीच्या कापणीसाठी आणि खरिपाच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना सध्या भांडवलाची आवश्यकता आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी हे भांडवल उपलब्ध करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बॅंकेने नाबार्डला यासाठी 25 हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. इतर व्यावसायिक बॅंकाही शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीशी लढण्यासाठी सवलतीच्या दरात कर्ज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. लॉकडाऊन काळातही शेतीच्या कामावर फारसा परिणाम झाला नाही.

रब्बीचे पूर्ण पीक हातात येत आहे. आता खरिपाच्या मशागतीचे कामही देशभर जोमात सुरू आहे. यावर्षी पाऊस चांगला होणार असल्यामुळे सरकारने या वर्षी अन्नधान्य उत्पादनाचे उद्दीष्ट वाढविले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.