नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने रुपयाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्यासाठी प्रयत्न करावा आणि छोट्या छोट्या देशातील निर्यातीचे पेमेंट भारतीय चलनातच स्वीकारण्याचे प्रयत्न करा, अशी सूचना स्टेट बॅंकेच्या रिसर्च अहवालात करण्यात आली आहे.
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेमेंट सिस्टीम विस्कळीत झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर या उपायाची गरज आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारत जो माल निर्यात करतो त्याचे पेमेंट संबंधित देशाकडून डॉलरऐवजी भारतीय रुपयात मागीतले तर भारतीय चलन मिळवण्यासाठी विविध देशांकडून प्रयत्न केले जातील आणि हळूहळू भारतीय चलनाला आंतरराष्ट्रीय मागणी वाढेल हा अर्थ यात एसबीआयला अपेक्षित आहे.
या अहवालात एकूण बॅकिंग क्षेत्रातील उलाढालीचाही आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात बॅंकिंग क्षेत्रातील कर्जाचे प्रमाण आता सुमारे 2 लाख 60 हजार कोटी रुपयांवर गेले आहे.
आणखी एका खासदाराचा उद्धव ठाकरेंवर लेटर बॉम्ब; केली ‘ही’ मागणी
याचाच अर्थ भारतीय अर्थव्यवस्था अडचणीच्या काळातही चांगली कामगीरी नोंदवत असल्याचे दिसत आहे असेही या अहवालात म्हटले आहे. बॅंकिंग व्यवस्थेत याच काळात 1 लाख 4 हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
गांगुली सर्वोत्तम कर्णधार होता – सचिन तेंडुलकर