रेशन कार्ड नसणाऱ्यांसाठीही अन्नधान्य योजनेसाठी प्रयत्न : डॉ. गोऱ्हे

येत्या दोन दिवसांत निर्णय होणार; उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे आश्‍वासन

पुणे – रेशन कार्ड नसणाऱ्या नागरिकांसाठी तसेच केशरी रेशन कार्ड धारकांना अन्न धान्याची योजना चालू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्‍वासन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

रिक्षा चालक, बांधकाम कामगार, घरेलू महिला आदींना मदत जाहीर केली आहे. यासंदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी एक बैठक आयोजित केली होती. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, कामगार आयुक्त पंकज कुमार, आयुक्त महेंद्र कल्याणकर, उपायुक्त शैलेंद्र पोळ, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अन्नधान्य उपलब्ध व वितरण करुन देण्याबाबत प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी यांची समिती तयार करण्यात यावी. तसेच राज्यातील असंघटित बांधकाम कामगार, घरेलू कामगार, फेरीवाले अशा सर्वसामान्य नागरिकांसाठी राज्य शासनाने जाहीर केलेली मदत मिळण्यासाठी सामाजिक संस्थांनी समन्वयाची भूमिका ठेवून काम करावे. असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.