कोपरगाव – कोपरगाव मतदारसंघातील उदयोन्मुख खेळाडूंना दर्जेदार क्रीडा साहित्य व खेळासाठी सर्व सुविधांयुक्त क्रीडा संकुल उपलब्ध करून दिल्यास कोपरगावचे खेळाडू निश्चितपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील याचा मला विश्वास आहे. त्यामुळे या खेळाडूंसाठी येथे अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.
शहरातील के.बी.पी. विद्यालयाच्या मैदानावर आ. काळे मित्रमंडळ, फ्रेंड्स क्रिकेट क्लब, श्री साई समर्थ प्रतिष्ठान, साई सिटी क्रिकेट क्लब व माऊली क्रिकेट क्लबतर्फे आयोजित “आमदार चषक भव्य डे नाईट’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या (के.पी.एल.) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आ.काळे यांच्या हस्ते स्पर्धेतील पहिल्या सामन्याचे नाणेफेक करून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.
आ. काळे म्हणाले की, शहरात तीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून एक नवे क्रिकेट पर्व सुरू होत असून, ही परंपरा यापुढे सुरू ठेवा. जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. यामध्ये तालुक्याचादेखील समावेश असावा ही माझी इच्छा आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून अनेक अष्टपैलू खेळाडू उदयास येत असून, केपीएल स्पर्धा आयपीएल स्पर्धेत प्रवेश करण्यासाठी उत्तम माध्यम ठरणार असल्याचा विश्वास आ. काळे यांनी व्यक्त करून आयोजकांनी स्पर्धेचे उत्तम नियोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
या वेळी धरमचंद बागरेचा, राजेंद्र कोयटे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, शहर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, ग्रामीण पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, रमेश गवळी, कृष्णा आढाव, राजेंद्र वाकचौरे, दिनकर खरे, अजीजशेख, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, बाळासाहेब रुईकर, आयोजक सोमनाथ आढाव, अनिरुद्ध काळे, अमोल गिरमे, संकेत पारखे आदींसह खेळाडू व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.