कोवॅक्‍सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत 81 टक्‍के परिणामकारकता

नवी दिल्ली  – भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडच्या भागीदारीसह भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने विकसित केलेल्या कोवॅक्‍सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीने 81 टक्‍के परिणामकारकता दाखवली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या मध्यावधीत “आयसीएमआर’ आणि भारत बायोटेकने संयुक्तपणे सुरू केलेल्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत 21 ठिकाणी एकूण 25,800 व्यक्तीवर या लसीची चाचणी घेण्यात आली. “डीसीजीआय’ने मंजूर केलेल्या प्रोटोकॉलनुसार विश्‍लेषण केलेल्या 81 टक्‍क्‍यांच्या अंतरिम परिणामकारकतेचा कल इतर जागतिक आघाडीच्या लसींइतका प्रभावी होता.

आठ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पूर्णपणे स्वदेशी कोविड -19 लसीचा निर्मितीपासूनचा प्रवास, प्रतिकूल परिस्थितीत जागतिक सार्वजनिक आरोग्य समुदायासमोर उभे राहण्याची क्षमता आणि आत्मनिर्भर भारताच्या तत्वाचा अंगिकार केल्याचे उत्तम उदाहरण आहे. जागतिक लस बाबतीत महासत्ता म्हणून भारताच्या उदयाचा हा देखील एक पुरावा आहे, असे “आयसीएमआर’चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले.

कोवॅक्‍सिन ही पहिली कोविड -19 प्रतिबंधक लस आहे जी संपूर्णपणे भारतात विकसित केली गेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.