पुणे- कुसरो वाडिया महाविद्यालयाच्या अणुविद्युत विभागात 18 फेब्रुवारी 2020 या तारखेला तळवळकर स्मारक तांत्रिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम्मुनिकेशन मधील नवीन तंत्रज्ञानावर विविध प्रकल्प व सादरीकरणे तयार केली. या सदारीकरण्यात विविध विषय मांडून त्यांना सादर केले. त्यापैकी एक आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता होते.अग्रीस्टोरेज (रोबोटिक्स), साऊंड अम्प्लिफायर, कॉन्व्हेयेर बेल्ट, बर्गलार इंडिकेटर सारख्या विविध तांत्रिक प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. प्रत्येक प्रकल्प इतरांपेक्षा उत्कृष्ट होता.
कार्यक्रमाचे उदघाटन मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वास्त डॉ.अभय हाके आणि अणुविद्युत विभागाचे विभाग प्रमुख डॉ.ए.एस.चांडक यांच्या हस्ते झाले. अणुविद्युत विभागाचे, विभाग प्रमुख डॉ.ए.एस.चांडक, सर्व विभागाचे विभाग प्रमुख व इतर शिक्षकांनी तळवळकर यांच्या प्रतिमेला मानवंदना केली. त्यानंतर स्पर्धा सुरू झाली. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.गावडे आणि प्रा.बी.एस. देवरे होते. प्रा. शुभांगी वर्मा, प्रा. ए.वाय.बोरकर आणि प्रा.जे.डी.कुलकर्णी हे स्पर्धेचे परीक्षक होते. परीक्षकांनी प्रकल्प व विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाची तपासणी केली.परीक्षकांनी उपस्थितांचे कौतुक केले आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन दिले.
परीक्षकांनी म्हटले ” स्पर्धात्मक दृष्टीकोनातून स्पर्धा न घेता विध्यार्थ्यांनी प्रकल्प व सादरीकरण उत्कृष्टपणे बनविला “. कार्यक्रम संपल्यानंतर सत्कार कार्यक्रम दरम्यान विभाग प्रमुख डॉ.ए.एस.चांडक यांनी तळवळकरांबद्दल काही महत्त्वाचे गोष्टी सांगितल्या. त्यांच्या वाक्यात ते म्हणाले ” सर्व सहभागांनी खरोखरच चांगले प्रदर्शन केले. या सर्वांनी या प्रतियोगीतेसाठी परिश्रम घेतले आहेत आणि प्रत्येकाने त्यांच्या बाजूने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.” त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले व विजेत्यांचा सत्कार केला. सादरीकरण प्रतियोगीतेमध्ये नमन आणि कुणाल यांनी ए.आय या विषयात पहिला क्रमांक पटकावला तर गणेश आणि प्रसन्न यांनी त्याच विषयात द्वितीय क्रमांक पटकावला. प्रकल्प प्रतियोगीतेचे विजेता ध्रुव, हर्षल , साक्षी आणि आयश्वर्या (अग्रीस्टोरेज (रोबोटिक्स)) होते. मयूर, रुथ्वीक, सुयश, हेमंत आणि शुभम यांच्या साऊंड अम्प्लिफायर प्रकल्पासाठी त्यांना द्वितीय क्रमांक भेटला. प.प्रथमेश, ए.प्रथमेश, अतुल आणि ज.ओंकार यांच्या कॉन्व्हेयेर बेल्ट प्रकल्पासाठी त्यांना तृतीय क्रमांक भेटले. तळवळकर स्मारक तांत्रिक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
– श्रेया अंबेटी ,
कॉलेज रिपोर्टर,
वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी