कामशेत : येथील जिल्हा परिषद शाळेत पहिल्या शिक्षण परिषदेत मान्यवरांचा सत्कार करताना डॉ. साठे. शाळा क्र. 2 मध्ये वार्षिकेतील शैक्षणिक पहिली शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. परिषदेचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोनल लोणकर, उपाध्यक्ष दत्ता शिंदे व केंद्र प्रमुख निलिमा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रातील सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
जिल्हा शैक्षणिक व संशोधन परिषदेतर्फे तज्ज्ञ मार्गदर्शक सुहास धस यांनी अध्ययन स्तर निश्चिती तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ याविषयी सर्व शिक्षकांना दैनंदिन अध्ययन-अध्यापनात उपयुक्त मार्गदर्शन केले. गावडे यांनी “माझा वर्ग-माझा उपक्रम’ या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी अध्ययन स्तर निश्चिती परीक्षेत इंग्रजी विषयात इयत्ता सातवीत प्रथम क्रमांक आलेल्या चिखलसे शाळेतील इयत्ता सातवीचे वर्गशिक्षक डॉ.सुनील साठे यांचे अभिनंदन करण्यात आले. खडकाळा नं. 2 शाळेचा द्वितीय क्रमांक व अहिरवडे शाळेचा तृतीय क्रमांक मिळाले. उत्कृष्ट काम केलेल्या शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. खडकाळा शाळा क्र. 2 चे मुख्याध्यापक चिमटे, तळेगावकर, आंग्रे, परदेशी, गोसावी आदी शिक्षकांनी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केल