ज्ञानदीप लावू जगी : पै परमाणु भूतळीं । हिमकणु हिमाचळीं ।

सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समाधी वर्ष (इ.स. 1296-2021)

– नारायण म. डमाळे शास्त्री

पै परमाणु भूतळीं । हिमकणु हिमाचळीं । मजमाजीं न्याहाळीं । अहं तैसें ।। हो कां तरंगु लहानु । परि सिंधूसी नाहीं भिन्नु । तैसा इश्‍वरीं मी आनु । नोहेचि गा ।। ऐसेनि या समरसें । दृष्टी जें उल्हासे । तें भक्ति पैं ऐसें । आम्ही म्हणों ।।

संत ज्ञानेश्‍वर महाराज श्री ज्ञानेश्‍वरीतील चौदाव्या अध्यायात म्हणतात की, पृथ्वीवर असलेला अल्प परमाणु जसा पृथ्वीरूप आहे अथवा बर्फाच्या पर्वतावरील कण जसा बर्फाचा पर्वतरूपच आहे.

त्याप्रमाणे तुम्ही आपला मी पणा माझ्या ठिकाणी (भगवंताच्या) पाहा. समुद्रावरची लाट जरी लहान असली, तरी ती समुद्राहून वेगळी नाही.

तसा मी ईश्‍वराचे ठिकाणी दुसरा (ईश्‍वराहून वेगळा) खरोखर नाही. अशा ऐक्‍याने जेव्हा दृष्टी विकसित होते त्याला आम्ही भक्‍ती म्हणतो. तसेच ईश्‍वर प्रत्येकाच्या हृदयात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.