ज्ञानदीप लावू जगी : रामकृष्णनाम सर्व दोषां हरण । जडजीवा तारण हरि एक ।।

सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समाधी वर्ष (इ.स. 1296-2021)

– ह.भ.प. चंद्रशेखर म. वारे

काळ वेळ नाम उच्चारिता नाहीं । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ।।
रामकृष्णनाम सर्व दोषां हरण । जडजीवा तारण हरि एक ।।
हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या दैवाची कोण वाणी ।।
ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठमार्ग सोपा ।।

संत ज्ञानेश्‍वर महाराज हरिपाठातील एकविसाव्या अभंगात म्हणतात, हरीचे नाम देण्याला शुद्ध काळ-वेळेची जरूरी नाही, ते हवे तेव्हा घ्यावे. त्या योगाने आपल्या आईचे कुळ व वडिलाचे कुळ अथवा नाम घेणारा व ऐकणारा या दोहोंचाही उद्धार होतो.

रामकृष्णांचे नाम सर्व पापांचा नाश करणारे आहे. याप्रमाणे सर्व पापांचा नाश करून जीवांना तारणारा एक हरीच आहे. हरिनाम हेच सार आहे. भजन करण्याकडे जिव्हेची ज्याने योजना केली आहे, त्याच्या दैवास कोणती उपमा द्यावी? ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात, मजकडून हरीचे चिंतन यथासंग झाले. आता माझ्या पूर्वजांना वैकुंठास जाण्याचा मार्ग सोपा झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.