नजिकच्या काळात देशात तीव्र ऊर्जाटंचाई
नवी दिल्ली, दि. 2 – नजिकच्या भविष्यकाळात विशेषतः 1976 ते 1985 या दरम्यान भारताला तीव्र ऊर्जाटंचाईला तोंड द्यावे लागण्याचा संभव आहे. पेट्रोलियम पदार्थांचा वापर कमी करण्यास भारतात मर्यादितच वाव आहे. कोळशाला 1973-74 साली 7.2 कोटी टन मागणी होती; ती 1978-79 साली 10.9 कोटी टनापर्यंत व 1985-86 साली तर 17.4 कोटी टनापर्यंत पोहोचेल.
“बॉम्बे हाय’मधून पुरवठा
पुढील वर्षी तेलाला जेवढी मागणी असेल त्याच्या 60 टक्के पुरवठा “बॉम्बे हाय’मधून होऊ शकेल. येथे दरसाल 2.5 कोटी टन या प्रमाणात तेल निघू शकेल.
ब्रिटनकडून भारताला 167.7 कोटी रुपयांची मदत
नवी दिल्ली – भारत व ब्रिटन यांच्यात चार करार झाले असून त्यानुसार ब्रिटन भारताला एकूण 167.7 कोटी रुपये अनुदान देणार आहे. एकूण 173.24 कोटी रुपयांची मदत देण्याचे ब्रिटनने मान्य केले होते. त्यापैकी हे 167.7 कोटी वगळता उरलेल्या 552 कोटी रुपयांची मदत मिळण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. ही उरलेली रक्कम कुटुंबनियोजन कार्यक्रमासाठी मिळावी यासाठी प्रयत्न चालू आहेत.
गुप्त अहवालाची नवीन पद्धत
नागपूर – नव्या पद्धतीनुसार प्रत्येक कर्मचाऱ्यास आपल्या वर्षभरातील कामाचा अहवाल द्यावा लागणार आहे, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.