Dainik Prabhat
Saturday, July 2, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home संपादकीय

विविधा : नानासाहेब पुरोहित

- माधव विद्वांस

by प्रभात वृत्तसेवा
May 28, 2022 | 5:32 am
A A
विविधा : नानासाहेब पुरोहित

“क्रांतिसिंह’ म्हणून ओळखले जाणारे स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार दिगंबर विनायक पुरोहित ऊर्फ नाना पुरोहित यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 28 मे 1907 रोजी महाड वरंधा रोडवरील काळ नदीच्या काठावरील बिरवाडी या गावात झाला. नानासाहेबांनी आपले आयुष्य सामाजिक बाबींसाठी व्यतीत केले. महाड परिसरात शेतकरी आंदोलन व स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी लक्षणीय कामगिरी केली होती.

नानासाहेबांनी रायगड मिलिटरी स्कूल ट्रस्टची स्थापना केली. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील पहिल्या रायगड मिलिटरी स्कूलची स्थापना 12 ऑगस्ट 190 रोजी रायगड जिल्ह्यातील महाडजवळील अचलोली गावात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी ही शाळा आहे. रायगडाच्या पायथ्याजवळील हे मिलिटरी स्कूल दुर्लक्षित झाले असून जवळ जवळ बंद अवस्थेत आहे.

वर्ष 1938 मधे कॉंग्रेस समाजवाद्यांनी शेतकऱ्यांना संघटित केले होते. “सावकारशाही ठेवायची नाही’ या घोषणेने भारावून महाड तालुक्‍यात शेतकरी आपल्या बायका-पोरांसह नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली संघटित होत होते. नानासाहेब कॉंग्रेस सोशालिस्ट पार्टी आणि भारत छोडो आंदोलनात अग्रेसर होते. त्यांनी महाडमध्ये बंडाचे नेतृत्व केले. त्यांनी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांसोबत हल्ला केला. त्यावेळी झालेल्या गोळीबारात एका सरकारी अधिकाऱ्याचा मृत्यू आणि पाच लोकांनी हौतात्म्य पत्करले. त्यानंतर नानासाहेब पुरोहित पोलिसांच्या जाळ्यातून पळून जाण्यात यशस्वी झाले. भोर मार्गे ते पुण्यात आले व अच्युत पटवर्धन यांची गाठ घेतली. त्यांच्यावर “शूट ऍट साइट’ असा आदेश होता. हे लक्षात येताच अच्युतरावांनी त्यांना कराचीला पाठविले. तेथे जाऊन ते बेकरी व्यवसाय शिकले. परत आल्यावर त्यांनी महाडमध्ये बेकरी व्यवसाय सुरू केला.

वर्ष 1948 मध्ये पुरोहित यांनी मोहन धारिया यांच्यासोबत जवळचे जंजिरा राज्य मुक्‍त करण्यासाठी लोकसेनेची स्थापना केली. बंडखोरांनी म्हसळे तालुक्‍याच्या सीमेवरील खामगाव येथे लष्करी छावणी स्थापन केली आणि तेथे स्वतंत्र जंजिरा राज्यासाठी हंगामी सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये पुरोहित (पंतप्रधान), सदाशिव बागाईतदार (गृहमंत्री), मोहन धारिया (परराष्ट्र मंत्री) आणि जनार्दन भोकरे (संरक्षण मंत्री) असे मंत्रिमंडळही निर्माण केले होते.

स्वातंत्र्यानंतर ते प्रजासमाजवादी पार्टीकडून राजकारणात उतरले. वर्ष 1957 च्या निवडणुकीत त्यांनी प्रजा सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार म्हणून महाडची जागा जिंकली. पाच वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्र विधानसभेत प्रसोपाचे उपनेते होते. 1962 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय कॉंग्रेसचे उमेदवार अब्दुल रहीम ए. गफूर अंतुले यांच्याकडून श्रीवर्धन मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. 10 वर्षांनंतर नानासाहेब वर्ष 1972 मध्ये महाडमधून महाराष्ट्र विधानसभेत परतले, पुन्हा महाडमधून वर्ष 1978 मध्ये सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार म्हणून निवडून आले. महाड येथे 27 नोव्हेंबर 1994 रोजी त्यांचे निधन झाले.

Tags: editorialeditorial page articleFormer MLA Digambar Vinayak PurohitNana Purohit

शिफारस केलेल्या बातम्या

आता भारतभर मान्सूनचे आगमन
अग्रलेख

आता भारतभर मान्सूनचे आगमन

1 day ago
अबाऊट टर्न – “फ्लोअर’टेस्ट
अग्रलेख

अबाऊट टर्न – “फ्लोअर’टेस्ट

1 day ago
मंथन – क्रिप्टोचा गडगडाट
संपादकीय

मंथन – क्रिप्टोचा गडगडाट

1 day ago
मीमांसा :  संरक्षण स्वावलंबनाचे वास्तव
संपादकीय

मीमांसा : संरक्षण स्वावलंबनाचे वास्तव

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

उदयपूर प्रकरणात नवा खुलासा; पाकिस्तानी हँडलर म्हणाला होता,’असा स्फोट करा की देश हादरायला हवा’

शिवसेनेला भगदाड ? शिंदे गटाशी जुळवून घ्या नाहीतर १२ खासदार…

‘फडणवीस-शिंदे जोडी’ महाराष्ट्रात पुन्हा विकास घडवून आणतील.

सत्तेमध्ये सातारा जिल्ह्यातील कुणाकुणाला संधी?

भक्‍ती अन्‌ शक्‍ती…! अडचण काळात पोलिसांनाही मदत 180 भावी सैनिक वारकऱ्यांच्या सेवेत

शिंदे सरकारची मोठी खेळी ! राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नवी यादी देणार ?

शहरी गरीबचे कार्ड क्षेत्रीय कार्यालयात

सेवाशुल्कवाढीने पशुपालक अडचणीत

“वायसीएम’मध्ये औषधांचा तुटवडा कायम

शहरावर पाणीटंचाईचे संकट

Most Popular Today

Tags: editorialeditorial page articleFormer MLA Digambar Vinayak PurohitNana Purohit

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!