ज्ञानदीप लावू जगी : नामामृत गोडी वैष्णवा लाधलीं। योगियां साधली जीवनकळा ।।

सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समाधी वर्ष (इ.स. 1296-2021)

-ह.भ.प. नारायण म. डमाळे शास्त्री

नामामृत गोडी वैष्णवा लाधलीं। योगियां साधली जीवनकळा ।। सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उद्धवला लाधला कृष्ण दाता।। ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ। सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ।।

हरिपाठातील आठव्या अभंगात माऊली म्हणतात, योग्यांना जीवनकलेच्या प्राप्तीमध्ये जे सुख व जी आवड आहे, तेच सुख व तीच आवड वैष्णवांना हरीच्या नामामृतसेवनामध्ये आहे.

प्रल्हादाच्या जिव्हेवर हरीच्या नामाचा उच्चार ठसला तसेच कृष्णासारखा उदार ज्ञानदाता उद्धवाला मिळाला. हरीचे नाम सर्व पारमार्थिक साधनांत सोपे आहे पण हरीचे नाम कोणी घेत नाही. त्याची सुलभता जाणून ते नाम सदोदित घेणारा मनुष्य क्‍वचितच आढळून येतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.