ज्ञानदीप लावू जगी : माझा मराठीची बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजासीं जिंके ।

सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समाधी वर्ष (इ.स. 1296-2021)

 – प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ

माझा मराठीची बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजासीं जिंके । ऐसीं अक्षरें रसिके । मेळवीन ।। जिये कोंवळिकेचेनि पाडें । दिसती नादीचे रंग थोडे । वेधे परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।

श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी, वाढीसाठी, तिच्या विकासासाठी अतिशय बहुमोल असे काम केलेल आहे. त्यासाठी मराठी भाषेचा त्यांनी प्रथम कैवार घेतला.

माऊली म्हणतात, माझे हे मराठी शब्द, बोलणे कौतुकाचे आपुलकीचे असून त्याची अमृताशी पैज लावली तर त्यांना जिंकणारी आहेत. अशाप्रकारे ते अक्षरे आहेत. ती खास रसिकासाठी रचना केलेली आहेत. ते शब्द आकर्षक आहेत.

मराठी शब्द थोडक्‍यात साच, मवाळ, मितले, रसाळ आणि अमृताचे कल्लोळ आहेत. तर संत तुकाराम महाराज म्हणतात, आमचे धन, द्रव्य, संपत्ती, वैभव, ऐश्‍वर्य, देव शब्दच आहेत. संतांनी मराठी भाषेसाठी केलेले कार्य कधीही विसरता येणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.