-महंत विष्णू म. केंद्रे
देवो देवी मीचि पाही । हाही विश्वास त्यांसी नाही ।
भाव तेते ठायी । वेगळाला धरी ।।
श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की, देव असो की देवी, सर्वत्र मीच आहे. पांडुरंग मीच आहे, रुक्मिणी मीच आहे. सर्वत्र मीच वेगवेगळ्या रूपाने नटतो, दिसतो, भासतो. ही माझीच लीला आहे.
देव-दानवांच्या सागर मंथनातून प्रगट झालेल्या चौदा रत्नांमध्येही सर्वत्र मीच आहे. लक्ष्मीच्या रूपानेही मीच प्रगट झालो. अमृताच्या कलशाबरोबर विषाचे कुंभ देखील मीच झालो. देव दानवांमध्येच अमृताची वाटणी करणाऱ्या मोहिनीचे रूप माझेच. विश्वरूपी पटावर जरी विविध रूप, रंगरूप, नामाचे प्रकार दाखवीत असले तरी संपूर्ण विश्वपटावर रंगणारा, रंगविणारा मी एकटाच आहे.
ऐशी हि निरूपाधिले । जगाची जिये जनके ।
तिये वंदिली मिया मुळीके । देवोदेवी ।।