दक्षिण व्हिएतनाममध्ये स्त्रियांना संपूर्ण स्वातंत्र्य
सायगॉव, दि. 23 – दक्षिण व्हिएतनाम देश राष्ट्रीय क्रांतिकारक सरकारने मुक्त केला त्याचवेळी दक्षिण व्हिएतनाममधील स्त्रियांचीही दास्यातून मुक्तता झाली, असे सायगॉव रेडिओवरून जाहीर करण्यात आले.
दोन्ही व्हिएतनामच्या एकीकरणाची तयारी
सायगॉव – उत्तर व्हिएतनाम व दक्षिण व्हिएतनामचे पुन्हा एकीकरण करण्याची तयारी उत्तर व्हिएतनाम सरकार करीत आहे, असे समजते. हा देश 1954 च्या युद्धानंतर जीनिव्हा कराराप्रमाणे 17व्या अक्षांक्षावर दुभंगण्यात आला आहे. आता दक्षिण व्हिएतनामचे निशाण जाऊन तेथे उत्तर व्हिएतनामचे निशाण फडकत आहे.
ब्रिटनमधील भारतीय डॉक्टरांवर नवे निर्बंध
लंडन – इंग्लंडमधील भारतीय डॉक्टरांवर नवे निर्बंध जारी केले आहे. त्यांना इंग्रजी बोलता आले पाहिजे ही पहिली अट. खासगी प्रॅक्टिस करावयाची असेल तर पूर्ण रजिस्ट्रेशन मिळणार नाही. त्यांना इस्पितळात किंवा इतर मेडिकल काउंसिलने मंजूर केलेल्या जागेवर काम करावे लागेल. आज ब्रिटनमध्ये 10 हजार भारतीय डॉक्टर प्रॅक्टिस करीत आहेत. त्यांना इंग्रजी बोलता येत नाही, अशी तक्रार तेथील रोगी करतात.
गोवा महाराष्ट्रात सामील?
पणजी – विशाल गोमंतकाची स्थापना करण्याचे स्वप्न काही हितसंबंधी पाहात आहेत व त्यांना गोवा मागील दाराने महाराष्ट्रात सामील करावयाचा आहे.