मुंबईत बौद्ध विद्यापीठ स्थापन होणार
मुंबई, दि. 5 – जपान बौद्ध संघाचे अध्यक्ष, आशिया खंडातील बौद्धांचे प्रमुख 91 वर्षांचे पूज्य महन्त फुजी गुरूजींचे म. हिंगाई, म. शांती शुगई (भारतीय बौद्ध संघाचे प्रमुख), म. शीबाशा या शिष्यवर्गासह भारतात आगमन झाले. त्यांनी मुंबई येथे बौद्ध विद्यापीठ काढण्याचा मनोदय प्रगट केला. त्यांनी भगवान बुद्धांची शिकवण आचारणात आणण्यास लोकांना सांगितले.
महिला करणार एव्हरेस्ट सर
काठमांडू – पंधरा जपानी महिला गिर्यारोहकांची एक तुकडी काल जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी येथून निघाली. तुकडीच्या प्रमुख एश्का हिसॅनो यांनी सांगितले की, “आम्ही एव्हरेस्ट सर करणे अशक्य नाही!’
भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत होण्याच्या दिशेने
नवी दिल्ली – भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध सुरळीत होण्याच्या दिशेने झपाट्याने प्रगती होत आहे, असे पाकचे पंतप्रधान भुट्टो यांनी एबीसी दूरचित्रवाणीला मुलाखत देताना सांगितल्याचे पाकिस्तान नभोवाणीवरून जाहीर करण्यात आले. पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीविषयी भुट्टो म्हणाले की, देशात दहशतवाद निर्माण करण्यात अफगाणिस्तानचा हात आहे!
पुन्हा “हिंदी चिनी-भाई भाई’
कलकत्ता – चिनी पत्रकार चाओ लुंग यांनी येथे असे सांगितले की, चिनी खेळाडू टेनिस स्पर्धात भाग घेण्यासाठी येथे आल्यामुळे “हिंदी चिनी भाई भाई’ ही घोषणा प्रत्यक्षात उतरली आहे. कारण चीनला भारताशी स्नेहसंबंध वाढवायचे आहेत.