Dainik Prabhat
Saturday, February 4, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

दखल : संसदेतील प्रलंबित आश्‍वासनांचा प्रश्‍न

- मिलिंद सोलापूरकर

by प्रभात वृत्तसेवा
November 28, 2022 | 5:20 am
A A
दिल्ली वार्ता : घडतंय बिघडतंय

संसदेत मागील पाच वर्षांपेक्षा अधिक जुनी जवळपास तीनशे सरकारी आश्‍वासने प्रलंबित आहे. तर सरकारद्वारे दिल्या गेलेल्या आश्‍वासनांची संख्या यावर्षी ऑगस्टअखेर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनांत 1641 आश्‍वासने प्रलंबित आहेत. सरकारी आश्‍वासने पूर्ण झाली तरच जनतेचा सरकारवरील विश्‍वास वाढत जातो.

संसद लोकशाहीचे मंदिर मानले जाते. भारतीय संसदेने देशाच्या इतिहासात अनेकदा महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. मात्र याच गौरवशाली संसदेत मागील पाच वर्षांपेक्षा अधिक जुनी जवळपास 300 सरकारी आश्‍वासने प्रलंबित आहेत. सरकारी आश्‍वासने जितकी लवकर पूर्ण होतील तितका जनतेचा शासनावरील आणि पर्यायाने लोकशाहीवरील विश्‍वास वाढत जातो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका क्षेपणास्त्र दुर्घटनेबाबत 15 मार्च रोजी संसदेत एक आश्‍वासन दिले होते. त्यामध्ये भारत आपल्या शस्त्रास्त्र प्रणालीच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे तसेच या दुर्घटनेची चौकशी करून त्यातील दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र नंतर या आश्‍वासनाला “प्रलंबित’ श्रेणीत टाकण्यात आले. सरकारी आश्‍वासनांना “प्रलंबित’ श्रेणीत टाकण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. संसदीय कामकाज मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, यावर्षी ऑगस्टअखेर सरकारने दिलेल्या आश्‍वासनांपैकी लोकसभेत 1005 आणि राज्यसभेत 636 आश्‍वासने प्रलंबित आहेत.

सदनात एखादे आश्‍वासन दिल्या गेल्यानंतर त्याची तीन महिन्यांच्या आत पूर्तता केली जाणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारचे मंत्रालय किंवा विभाग आश्‍वासनासाठी निर्धारित तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यास असमर्थ असल्याने हा अवधी वाढवून देण्याची मागणी करीत आहे. कनिष्ठ सदनात 10 वर्षांपेक्षा अधिक जुने 38 सरकारी आश्‍वासने प्रलंबित आहेत. तर पाच वर्षांपेक्षा अधिक जुने 146 आश्‍वासने तसेच 3 वर्षांपेक्षा अधिक जुने 185 आश्‍वासने प्रलंबित आहेत. टक्‍केवारीत पाहिल्यास, लोकसभेत 18 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक सरकारी आश्‍वासने तीन वर्षांपेक्षा अधिक आणि 14 टक्‍के आश्‍वासने पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून प्रलंबित आहे. लोकसभेत सर्वाधिक 82 आश्‍वासने कायदा आणि न्याय मंत्रालयाचे प्रलंबित आहेत. तर रेल्वे मंत्रालयाचे 61, शिक्षण मंत्रालयाचे 56, संरक्षण मंत्रालयाचे 50, रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाचे 48, रसायन आणि खत मंत्रालयाचे 47, अर्थ मंत्रालयाचे 39, सामाजिक न्याय आणि हक्‍क मंत्रालयाचे 35, पर्यटन मंत्रालयाचे 32, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे 31 आश्‍वासने प्रलंबित आहेत. या सर्व प्रलंबित आश्‍वासनाची पूर्तता होणे गरजेचे आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकदा म्हटले होते, की “सरकारी सेवेतील विलंब जनअसंतोषाचे कारण बनते.’ सरकारच्या सर्व विभागांनी याकडे गांभीर्याने पाहायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः वेळेवर सरकारी कामकाज पूर्ण व्हावे अशा मताचे आहेत आणि वेळोवळी सरकारी विभागांना याबाबत जागेही करीत असतात. असे असूनसुद्धा सरकारचे शेकडो विकास प्रोजेक्‍टस वेळेत पूर्ण न झाल्याने अजूनही अपूर्ण अवस्थेत आहेत.

संसदीय व्यवस्थेत नियंत्रणासाठी एक महत्त्वाची यंत्रणा आहे. त्यानुसार सरकारी आश्‍वासनासंबंधी समिती मंत्र्यांद्वारे सदनात वेळोवेळी दिल्या गेलेल्या आश्‍वासनांची चौकशी करते आणि अहवाल तयार केला जातो आणि अशा आश्‍वासनांना पूर्ण करणे किती शक्‍य आहे, हे पाहिले जाते. मंत्रालयाचे विभाग या आश्‍वासनांना पूर्ण करण्यास असमर्थ ठरत असतील तर, असे आश्‍वासन देण्यापूर्वी या समितीची शिफारस घ्यावी लागते. समिती अशा शिफारशीवर विचार करून जर आश्‍वासन योग्य वाटले तर अनुमती देते. आकडेवारीनुसार, लोकसभेत अल्पसंख्याक कामकाज मंत्रालयाचे 10 आश्‍वासने तब्बल 10 वर्षांपासून प्रलंबित आहेत. यावरून लक्षात घ्या, की या आश्‍वासनांची पूर्तता होणे किती गरजेचे आहे. त्यामुळचे संसदेत दिली जाणारी आश्‍वासने वेळेत पूर्ण व्हायला हवीत.

निवडणूक प्रचारातील आश्‍वासने पूर्ण केली जात नाहीत, असा सर्वसामान्यांचा समज आहे. मात्र संसदेतीलही आश्‍वासने पूर्ण होत नसतील तर लोकशाहीला काही अर्थ उरतो का?

Tags: editorial page articleparliamentPending Assurancesquestion

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : पदवीधर निवडणुकांत भाजप फेल!
Top News

अग्रलेख : पदवीधर निवडणुकांत भाजप फेल!

12 hours ago
वेध : ऊर्जाक्षेत्रातील आगेकूच
Top News

वेध : ऊर्जाक्षेत्रातील आगेकूच

12 hours ago
विविधा : तानाजी मालुसरे
Top News

विविधा : तानाजी मालुसरे

13 hours ago
लक्षवेधी : चीनसाठी अमेरिकी व्यूहनीती
Top News

लक्षवेधी : चीनसाठी अमेरिकी व्यूहनीती

13 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

लग्न करून सासरी आल्यावर नववधुने पहिल्याच रात्री केली चोरी; दागिने, रोकड घेऊन लंपास

फसव्या स्किमने केला घात

परदेशी पाहुण्यांबाबत कमालीची उदासीनता

तीन वेळा विजयी झालेल्या 71 खासदारांच्या संपत्तीत मोठी वाढ; संख्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

बाळासाहेब राऊत यांना डॉक्टरेट पदवी

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

VIDEO ! बिल गेट्स यांनी स्वतः कुकिंग करत बनवला भारतीय पदार्थ; PM मोदींनी कौतुक करत दिला ‘हा’ सल्ला

मसूरचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या आकर्षक मूर्ती; आजपासून यात्रेला सुरुवात

कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शैलेश टिळक नाराज; मनातील खंत व्यक्त केली….

‘करा रक्तदान ठेवा माणुसकीचे भान’! दैनिक प्रभात आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Most Popular Today

Tags: editorial page articleparliamentPending Assurancesquestion

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!