Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home संपादकीय

विविधा : इंदुताई पटवर्धन

- माधव विद्वांस

by प्रभात वृत्तसेवा
May 14, 2022 | 5:30 am
A A
विविधा : इंदुताई पटवर्धन

समाजाने दूर अंध:कारात लोटलेल्या कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका, राजकुमारी डॉ. इंदुताई पटवर्धन यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म जमखिंडीच्या राजघराण्यात 14 मे 1926 रोजी झाला.

इंदुताईंचे शिक्षण जमखिंडी व कोल्हापूर येथे झाले. राजकुमारी म्हणून जन्मलेल्या इंदूताईंनी 16व्या वर्षी गांधीजींच्या चळवळीस वाहून घेतले. मॉंटेसरी शिक्षणक्रम पूर्ण करून त्या सेंट कोलंबो स्कूलमध्ये शिक्षिका बनल्या. पुढे ब्रिटिश इंडियन रेड क्रॉस आणि सेंट जॉन ऍम्ब्युलन्सच्या कामामध्ये दाखल झाल्या. दुसऱ्या महायुद्धातत्या प्रत्यक्ष युद्धभूमीवर जखमी लष्करी जवानांचे शुश्रुषेसाठी ब्रह्मदेश, जावा येथे गेल्या. सिंगापूर, जपान, येथेही त्यांनी काम केले. वर्ष 1953 मध्ये सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी होमिओपॅथीचे शिक्षण घेतले. खेड शिवापूर येथे दवाखाना सुरू केला. पूना विमेन्स काउंसिलचे कामही त्या करीत होत्या. पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनच्या त्या संस्थापक-सदस्या होत्या. लष्करातील जवान व आदिवासी समाजातील आजारी, जखमी रुग्णांची सेवा करत त्यांनी आपले आयुष्य अर्पण केले. त्यासाठी त्या जन्मभर अविवाहित राहिल्या.

मुंबई इलाख्यात आपले जमखंडी संस्थान विलीन करणारे त्यांचे भाऊ राजा परशुराम शंकरराव पटवर्धन हे भारतीय राजघराण्यांपैकी पहिले संस्थानिक होते. पुणे येथील पूना कॉलेजला सर परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या स्मरणार्थ दोन लाख रुपये इतकी देणगी त्यांनी दिली होती व तेव्हापासून ते कॉलेज सर परशुरामभाऊ कॉलेज (एस. पी. कॉलेज) म्हणून ओळखले जाऊ लागले.

ऑक्‍सफॉम या संस्थेकडून 1961 साली मिळालेल्या 17 हजार रुपयांच्या मदतीवर पुण्याजवळच्या डुडळगाव येथील एका ओसाड जागेवर “आनंदग्राम’ नावाने कुष्ठरोग्यांची वसाहत उभी केली. पश्‍चिम महाराष्ट्रात पुण्याजवळ कुष्ठरोग सेवाकेंद्र सुरू करणाऱ्या त्या पहिल्या महिला कार्यकर्त्या आहेत. वर्ष 1965 मध्ये महाराष्ट्र शासनाचा भिक्षा प्रतिबंध कायदा अमलात आल्यावर त्यांनी 80 रुग्णांसह कुष्ठरोग्यांसाठी प्रत्यक्षात वर्ष 1965 मध्ये काम सुरू केले. आळंदी जवळच्या सध्याच्या “आनंदग्राम’ येथे वर्ष 1970 मध्ये त्यांनी स्थलांतर केले.

उला लेडी हाइड पार्कर, राधा रमणजी अशा व्यक्‍तींच्या सहाय्यामुळे “आनंदग्राम’ला सध्याचे विशाल स्वरूप आल्याचा त्या कृतज्ञतेने उल्लेख करतात. सध्या आश्रमात राहणाऱ्यांकडून येथे शेती, कुक्‍कुटपालन, गोपालन, कापड उद्योग आदी अनेक उपक्रम यशस्वीपणे चालविले जातात. रेशमासाठी तुती इत्यादीची लागवड केली जाते. मुला-मुलींनी फुलून आलेल्या शाळा, शेतीला नियोजन करून दिलेले पाणी, सदैव कार्यरत असलेले हात, हे आनंदग्रामचे आजचे आदर्शवत ठिकाण झाले आहे. खाद्यतेल सोडले तर सर्व काही इथेच बनते, धान्य पिकते, हातमागावर कपडे तयार होतात, दवाखाना, केशकर्तनालय इथे आहे. गोबर गॅस बनतो. इतके स्वयंपूर्ण गाव येथे त्यांनी उभे केले.

इंदुताई पटवर्धन यांच्या कार्याची दाखल घेऊन शासनाने त्यांना दलितमित्र हा पुरस्कार दिला. 8 फेब्रुवारी 1999 रोजी त्यांचे निधन झाले.

Tags: editorial page articleIndutai Patwardhan

शिफारस केलेल्या बातम्या

चार दिवसांचा आठवडा अन् दिवसात सहा तासांचं काम!
latest-news

अमृतकण : इकडून काढा, तिकडे लावा

1 hour ago
47 वर्षांपूर्वी प्रभात : भाववाढ टाळण्यासाठी समाजवादी समाजव्यवस्था हवी
latest-news

47 वर्षांपूर्वी प्रभात : भाववाढ टाळण्यासाठी समाजवादी समाजव्यवस्था हवी

1 hour ago
मे महिन्यात पारा ५० डिग्री सेल्सिअस पार? हवामान खात्याचा धडकी भरवणारा अंदाज…
latest-news

वास्तव : उष्मालाटेचा दाह

2 hours ago
पोटनिवडणुकीतील अपयशानंतर मुख्यमंत्री चंद्रशेखर राव भाजपला टक्कर देण्याच्या तयारीत
latest-news

वेध : दिल्लीच्या गादीवर दक्षिणेचा दावा

2 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पुणे पालिका निवडणुकीसाठी आरक्षित प्रभाग जाहीर

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

पूर्व लडाखमध्ये चीन उभारतोय दुसरा पुल

चीन, पाकिस्तानचा संभाव्य धोका; भारताच्या लष्करी आधुनिकीकरणाची अमेरिकेने घेतली दखल

दक्षिण आफ्रिकेच्या हमजावर आयसीसीकडून बंदी

नोर्जे, पार्नेलचे संघात पुनरागमन; भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ जाहीर

तिलम वर्मा इंडिया मटेरियल – गावसकर

Most Popular Today

Tags: editorial page articleIndutai Patwardhan

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!