ज्ञानदीप लावू जगी : विटे जो कां सकळ विषयां

सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समाधी वर्ष (इ.स. 1296-2021)

तरी आत्मसुखाचिया गोडिया। विटे जो कां सकळ विषयां। जयाच्या ठायीं इंद्रियां। मानु नाहीं ।।186।। (4 था अध्याय) 

ज्याला आत्मसुखाच्या गोडीमुळे ऐहिक व पारलौकिक विषय नको वाटतात त्याच्या ठिकाणी इतर कसल्याही विषयाची आसक्‍ती नसते. तोच खऱ्या अर्थाने ज्ञानाचा अधिकारी होतो. जोड अध्यायातील ही ओवी आहे. 

या अध्यायाच्या 34 व्या श्‍लोकापासून 12 व्या अध्यायापर्यंत उपासनाकांड आहे. म्हणून कर्मकांड आणि उपासनाकांड हे दोन्ही या अध्यायात समाविष्ट आहेत. ज्ञान आणि गुरूकृपा हे आत्मसुख प्राप्तीचे दोन मार्ग आहेत. गुरू सेवेतून विवेक वैराग्यद्वारा आत्मप्राप्ती होते. 

या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर सखे संबंधीही आपले राहात नाहीत. जसे जंगलातील एखाद्या वृक्षाला आग लागावी तेव्हा त्यावर अवलंबून राहणारे सर्व पक्षी उडून जातात त्याचा संग सोडतात तद्वत आत्मज्ञानी पुरुषाचीही अशीच अवस्था होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.