ज्ञानदीप लावू जगी : तरी जयांचि चोखटें मानसीं । मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी ।

सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समाधी वर्ष (इ.स. 1296-2021)

-ह.भ.प. रोहिदास म. उभे

तरी जयांचि चोखटें मानसीं । मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी । जयां निजेल्यातें उपासी । वैराग्य गा ।। 

श्री ज्ञानेश्‍वरीच्या नवव्या अध्यायात संत ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात की, ज्या मनुष्याचे मन, चित्त शुद्ध आहे, तसेच जे वैराग्यसंपन्न आहेत आणि स्वप्नातही ज्यांचे वैराग्य अढळ राहते, त्यांच्या हृदयात भगवंत निरंतर वास करतो. 

जगद्‌गुरू तुकोबारायही एका अभंगात म्हणतात की, चित्त शुद्ध करा. जर तुम्ही तुमचे चित्त शुद्ध केले तर तेथे हरी येईल आणि कायमस्वरूपी राहील. 

तुका म्हणे चित्त करारे निर्मळ । येऊनी गोपाळ राहे तेथे ।। 

मग हे चित्त शुद्ध कसे होते? ते शुद्ध करण्यासाठी काय उपाय आहे का? 

तर तो उपाय देखील तुकोबाराय सांगतात, 

महामळे मन होते जे गाधले । शुद्ध चोखाळले स्फटीक जैसे । जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस… 

तुमच्या जिभेला “विठ्ठल’ या तीन अक्षरांची एकदा का गोडी लागली आणि सतत नामस्मरण केले तर तुमचे मन, चित्त शुद्ध होईल आणि पंढरीचा परमात्मा तुमच्या हृदयात कायमस्वरूपी राहण्यासाठी येईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.