ज्ञानदीप लावू जगी : सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।

सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समाधी वर्ष (इ.स. 1296-2021)

-ह. भ. प. प्रशांत महाराज मोरे देहुकर

सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।                                                                                                                 जो घ्राणसंगें विषादु । तोषु देता ।। तैसाचि द्विविध रसु।                                                                               उपजवी प्रीति त्रासु। म्हणौनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ।।

माऊली म्हणतात, सुगंध आणि दुर्गंध हा भेद एकाच गंधाचा आहे. परंतु तो नाकाशी संपर्क आल्यावर समाधान आणि विषाद उत्पन्न करतात. त्याच अनुषंगाने “रस’ विषयाचा रसनेंद्रियांशी संयोग आल्यावर प्रतिकूल- अनुकूल असे कडू-गोड दोन भेद निर्माण होतात. म्हणजे विषयांचा संबंध
अतःकरणात प्रीती आणि तिटकारा उत्पन्न करतो. म्हणून विषयाचा संग आपल्या अत:करणाला विकृत करणारा आणि स्वरूपाचा, ज्ञानाचा विसर पाडणारा आहे.

अर्थात, मनुष्य जेव्हा इंद्रियाच्या स्वाधीन होतो तेव्हा तो आपणहून सुखदुःखात जखडला जातो. विषयावाचून या जगतामध्ये सुखदायक सर्वतोपरी असे काहीच नाही, असा इंद्रियांचा स्वभाव असतो, त्यामुळे ती आपोआप विषयांकडे आकर्षित होतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.