ज्ञानदीप लावू जगी : हा विचारूनि अहंकारु सांडिजे । मग असतीचि वस्तु होईजे ।

सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समाधी वर्ष (इ.स. 1296-2021)

– ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहुकर

हा विचारूनि अहंकारु सांडिजे । मग असतीचि वस्तु होईजे । तरी आपली स्वस्ति सहजें । आपण केली ।। 71 ।। एर्हवीं कोशकीटकाचिया परी । तो आपणया आपण वैरी । जो आत्मबुद्धि शरीरीं । चारुस्थळीं ।। 72 ।।कैसे प्राप्तीचिये वेळे । निदैवा अंधळेपणाचे डोहळे । कीं असते आपुले डोळे । आपण झांकी ।। 73।। अध्याय 6 वा

विवेकपूर्ण चित्ताने आपल्या आत्म्याला जिंकले आहे तो स्वतःच स्वतःचा मित्र आहे, पण ज्याचा स्वतःवर ताबा नाही, तो स्वतःचा शत्रू होतो. विचारपूर्वक अहंकार टाकला की आपले ब्रह्मस्वरूप आपल्याच ठिकाणी दिसून येते. असे झाले की आपणच आपले कल्याण करण्यासारखे होते.

जो शरीराच्या सौंदर्याला भुलून देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी ठेवतो, तो स्वतःभोवती कोश करून, त्यात राहणाऱ्या किड्याप्रमाणे आपणच आपला शत्रू होतो. धनलाभाची संधी आली असताना, दुर्भाग्याला आंधळेपणाचे डोहाळे लागतात आणि समोर धन असले तरी आपले डोळे झाकून घेतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.