ज्ञानदीप लावू जगी : नम्र झाला भुता । तेणे कोंडिले अनंता ।।

सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समाधी वर्ष (इ.स. 1296-2021)

-डॉ. पांडुरंग मिसाळ

अखंड भगवंता होऊनि असती । तयांते विनयो हेचि संपत्ती। जे जयजय मंत्रे अर्पिती। माझांचि ठायीं ।। नमिता मानाभिमान गळाले। म्हणोंनि अवचितें ते मीचि जहाले। ऐसे निरंतर मिसळले। उपासिती।।

माऊलीने महापुरुष, साधू, संत, ज्ञानी यांची लक्षणे सांगितली आहेत. सामान्य माणूस यांच्या व्यवस्थेत व अवस्थेत फरक असतो. संत, महात्मे, साधू हे पूर्णबोध अवस्थेवर पोहोचल्यामुळे ते साक्षात्कारी व अखंड निराभिमानी होत असतात. 

म्हणून विनय, नम्रता हा गुण त्यांच्या ठिकाणी वास्तव्यास कायमचा येतो. त्यामुळे भगवान म्हणतात, जे जे काही अर्पण करतात, ते ते मला मिळते. तो महात्मा नम्र झाल्यामुळे त्याचा अहंकार गळून पडतो. विनय हीच त्याची संपत्ती होते. म्हणून अशा भक्‍तांना ईश्‍वर प्राप्त होतो.

 नम्र झाला भुता । तेणे कोंडिले अनंता ।। 

म्हणून तो देवाला हृदयात साठवू शकतो. त्याचे सर्व विश्‍व घर, कुटुंब होते. त्यांच्या अंगी कसलाही भेदभाव राहत नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.