Dainik Prabhat
Thursday, February 9, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

लक्षवेधी : निर्णायक निवडणूक

- प्रा. अविनाश कोल्हे

by प्रभात वृत्तसेवा
November 29, 2022 | 5:40 am
A A
लक्षवेधी : निर्णायक निवडणूक

भाजपा गुजरातमध्ये गेली अनेक वर्षे सत्तेत आहे. एवढी वर्षे सत्तेत राहिल्याचे जसे फायदे असतात तसेच तोटेसुद्धा असतात.

गुजरातेतील मतदारांसमोर मोरबी पूल दुर्घटना, वाढती महागाई, बेरोजगारी, मूलभूत सोयीसुविधांत असलेल्या त्रुटी वगैरे मुद्दे भाजपाच्या विरोधात जाण्याची शक्‍यता आहे. गेली दोन वर्षे गुजरातेत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कमालीचे नुकसान झालेले असले तरी त्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. तसं पाहिलं तर गुजरातच्या राजकारणात मुस्लीम समाजाची मतं तशी महत्त्वाची नसली तरी बिल्कीस बानो प्रकरणी समाजाच्या काही घटकांत नाराजी आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

गुजरातचा राजकीय इतिहास अभ्यासला तर दिसून येते की तेथे मध्य प्रदेश, राजस्थानसारखी द्विपक्ष पद्धत रूढ झालेली आहे. गुजरातेत आज जे भाजपाचे स्थान आहे तसे एकेकाळी कॉंग्रेसचे होते. आणीबाणी नंतरच्या राजकारणात जनता दल ही तिसरी शक्‍ती काही काळ उदयाला आली. मात्र, लवकरच ही शक्‍ती लोप पावली. आता गेली काही वर्षे गुजरात राज्यात अरविंद केजरीवाल यांचा “आम आदमी पक्ष’ या नव्या राजकीय शक्‍तीने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. 2017 साली गुजरातचे ज्येष्ठ नेते शंकरसिंग वाघेला यांचा पक्षसुद्धा रिंगणात होता. या पक्षालासुद्धा यश मिळाले नव्हते. भाजपाला गुजरातेत 1995 साली जेव्हा सत्ता मिळाली तेव्हा भाजपात असलेल्या शंकरसिंह वाघेला यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडत होती. पण पक्षाने त्याकडे दुर्लक्ष करून केशुभाई पटेल यांची निवड केली. त्या निवडणुकीत भाजपाला एकूण 182 जागांपैकी 121 जागा जिंकता आल्या होत्या. वाघेला यांनी सुरुवातीला बंडाचा इशारा देऊन नेतृत्वबदल घडवून आणला. परिणामी केशुभाईंना जावे लागले व वाघेला समर्थक असलेल्या सुरेश मेहतांची वर्णी लागली. अर्थात ही रचना फार काळ टिकणारी नव्हतीच.

पुढच्याच वर्षी वाघेलांनी पक्ष फोडला व कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर ऑक्‍टोबर 1996 मध्ये मुख्यमंत्री झाले. 1998 साली झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाला सत्ता मिळाली. या निवडणुकीत भाजपाने 117 जागा जिंकल्या व पुन्हा एकदा केशुभाई मुख्यमंत्री झाले. पण या खेपेससुद्धा त्यांना नरेंद्र मोदींसाठी पद सोडावे लागले व 2001 मध्ये मोदी मुख्यमंत्री झाले. मोदी या पदावर तब्बल साडेबारा वर्षे होते. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यावर मोदी पंतप्रधान झाले.

1998 साली अस्तित्वात आलेल्या गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 2003 साली संपला असता. पण मोदींनी त्याआधीच विधानसभा बरखास्त केली व डिसेंबर 2002 मध्ये विधानसभा निवडणुका घेतल्या. तेव्हा असे वातावरण होते की, भाजपाचा दारुण पराभव होईल. पण प्रत्यक्षात भाजपा दणदणीत बहुमताने विजयी झाला. भाजपाने 127 जागा जिंकल्या! मोदी 2014 साली पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून आनंदीबेन पटेल यांना 22 मे 2016 रोजी नेमले. आनंदीबेन यांच्या दुर्दैवाने पटेल समाजातील चिडलेल्या तरुणांनी हार्दिक पटेल या तरुणाच्या नेतृत्वाखाली जुलै 2015 मध्ये निदर्शने सुरू केली. बघता बघता हार्दिक पटेल यांच्या आंदोलनाची आग राज्यभर पसरू लागली. सरतेशेवटी आनंदीबेन यांना ऑगस्ट 2016 मध्ये पायउतार व्हावे लागले व त्यांच्या जागी विजय रूपानी यांना संधी देण्यात आली. गंमत म्हणजे आता स्वतः हार्दिक पटेल भाजपात आहे. या खेपेस मात्र परिस्थिती वेगळी असल्याचे काही अभ्यासक मान्य करत आहेत. या विधानसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यात प्रथमच मतदान करणाऱ्यांची संख्या सुमारे 11.74 लाख एवढी आहे. या राज्यांतील एकूण मतदारांची संख्या 4.9 कोटी एवढी आहे.

काही निवडणूक सर्वेक्षणांनुसार या खेपेस भाजपाला 47 टक्‍के मतं, कॉंग्रेसला 21 टक्‍के तर “आप’ला 22 टक्‍के मतं मिळतील असा अंदाज आहे. आजच्या गुजरात भाजपात भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाबद्दल फारसे असमाधानही नाही. 2017 सालच्या विधानसभा निवडणुकांत छोटे व्यापारी आणि शेतकरी भाजपावर नाराज होते. आज तशी स्थिती नाही. वस्तू आणि सेवा कराबद्दल तेव्हा जो राग होता तो आता राहिलेला नाही. भाजपाच्या एकूणच राजकारणात “गुजरात राज्यातील विकासाचे प्रारूप’ हा महत्त्वाचा घटक आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजपाने हे “गुजरात प्रारूप’ जोरदारपणे प्रचारात आणले होते. याच्या जोरावर भाजपाने राजकीय विरोधकांची तोंडं बंद केली होती. आता पुन्हा एकदा भाजपा मतदारांसमोर जात आहे. कॉंग्रेस आणि “आप’साठी या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. कॉंग्रेससाठी “दुसरा क्रमांकाचा पक्ष’ हे पद घालवणे परवडणारे नाही तर “आप’ला सत्ता मिळवण्याची आकांक्षा आहे. “आप’ने पंजाब खिशात घातलेला आहेच. अशा स्थितीत “आप’ने जोर लावलेला आहे तसेच कॉंग्रेससुद्धा तयारीत आहे. याचा अंदाज भाजपा धुरिणांना आहे. म्हणूनच त्यांनी मागच्या वर्षी गुजरातेतील सर्व मंत्रिमंडळाचा राजीनामा घेतला होता आणि भूपेंद्र पटेल या पहिल्यांदाच आमदार झालेल्या व्यक्‍तीला मुख्यमंत्रिपदी बसवले होते.

काही अभ्यासक या निवडणुकांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहेत. भाजपाने सत्ता राखली तरी किती जागा जिंकल्या आणि किती टक्‍के मतं मिळवली, याकडे लक्ष लागलेले आहे. यापैकी दोन्ही किंवा एकाही घटकात जर घट झाली तर त्याचा अर्थ व्यापक प्रमाणात लावण्यात येईल. जागा आणि मतं कमी झाली तर याचा परिणाम 2024 सालच्या लोकसभा निवडणुकांवर होईल असा (सोपा?) निष्कर्ष काढला जाईल. शिवाय यामुळे कॉंग्रेसचा आणि “आप’चा उत्साह वाढेल. “आप’ एका बाजूने प्रथमच मतदान करणारे तरुण आपल्याकडे खेचेल असासुद्धा अंदाज आहे. मात्र “आप’ची खरी भूमिका कॉंग्रेसची मतं खाणं ही आहे, अशी मांडणी करणारे अभ्यासक भरपूर आहेत. म्हणूनच कॉंग्रेसचे नेते अधूनमधून “आप’ भाजपाची “बी टीम’ आहे, असे आरोप करत असतात. एका वेगळ्या अर्थाने ही निवडणूक कॉंग्रेससाठीसुद्धा फार महत्त्वाची आहे. सप्टेंबर 2022 मध्ये सुरू झालेल्या राहुल गांधींच्या “भारत जोडो’ यात्रेला अनेक ठिकाणी अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला आहे. यामुळे देशभर कॉंग्रेसमध्ये उत्साह संचारलेला आहे. मात्र गर्दी म्हणजे मतं नव्हे, असा अनुभव अनेकदा आलेला आहे. भारत जोडो यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर पहिल्यांदा होत असलेली विधानसभा निवडणूक म्हणून गुजरातकडून कॉंग्रेसला फार अपेक्षा आहेत.

आकडेवारी समोर ठेवली तर असे दिसते की 1962 ते 1985 दरम्यान कॉंग्रेसचे विधानसभेत दोनतृतीयांश आमदार निवडून येत असत. 1990 सालानंतर कॉंग्रेसची घसरगुंडी सुरू झाली. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे कॉंग्रेसने 2012 साली 61 जागा जिंकल्या होत्या तर 2017 साली यात वाढ झाली होती. त्या वर्षी कॉंग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या. आता कॉंग्रेसच्या कामगिरीकडे लक्ष लागलेले आहे. थोडक्‍यात, 8 डिसेंबरला जाहीर होत असलेल्या निकालांबद्दल कुतूहल आहे.

Tags: AAPbjpcongresseditorial page articleGujarat Assembly Electionगुजरात विधानसभा निवडणूक

शिफारस केलेल्या बातम्या

आमदार प्रज्ञा सातवांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या,“दारुच्या नशेत असणाऱ्याने अचानक बाजूला ओढून चापट मारली””
Top News

आमदार प्रज्ञा सातवांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या,“दारुच्या नशेत असणाऱ्याने अचानक बाजूला ओढून चापट मारली””

12 mins ago
अग्रलेख : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे महत्त्व
Top News

अग्रलेख : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे महत्त्व

9 hours ago
लक्षवेधी : सिंधू नदीचे पाणी पेटेल का?
Top News

लक्षवेधी : सिंधू नदीचे पाणी पेटेल का?

9 hours ago
अर्थकारण : महाराष्ट्रातील नवे विकासप्रकल्प?
Top News

अर्थकारण : महाराष्ट्रातील नवे विकासप्रकल्प?

10 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

आमदार प्रज्ञा सातवांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या,“दारुच्या नशेत असणाऱ्याने अचानक बाजूला ओढून चापट मारली””

“सत्यजीत तांबेंना अपक्ष उमेदवारी का दाखल करावी लागली, याची…”; अशोक चव्हाण यांचे मोठे वक्तव्य

Cow Hug Day वरून संजय राऊतांची जहरी टीका,’पंतप्रधान नरेंद्र मोदी अदाणींना ‘हग’ करून…’

“किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर…”; हसन मुश्रीफ यांचा सोमय्यांवर पलटवार

विठुराया पावला! यंदाच्या माघी यात्रेत तब्बल 4 कोटी 88 लाखांचे भाविकांकडून भरभरुन दान; मंदिर समितीच्या उत्पन्नात चौपट वाढ

एआयएमपीएलबीची सर्वोच्च न्यायालयात माहिती; म्हणाले,“मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास मनाई नाही, मात्र …”

पशुसंवर्धन विभागाचा सल्ला,’गायीला मिठी मारुन साजरा करा यंदाचा व्हॅलेंटाईन डे’

ट्विटर, मेटा, ॲमेझॉन, गुगलनंतर आता जगातील ‘या’ बड्या कंपनीने सुरु केली नोकरकपात; तब्बल ७ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

संजय राऊतांनी दिल्या मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, म्हणाले,’आम्ही राजकीय शत्रू आहोत अन् …’

ज्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेची रॅली निघाली, त्याच गावात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार

Most Popular Today

Tags: AAPbjpcongresseditorial page articleGujarat Assembly Electionगुजरात विधानसभा निवडणूक

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!