अणुचाचणी बंदीबाबत हॉवर व मॅकमिलनचे एकमत
गेटिसबर्ग, ता. 30 – इतर सर्व अणुचाचण्या बंद करण्याची रशियाने तयारी दाखविली तर जमिनीखालील छोट्या चाचण्याबाबत काही काळपर्यंत सवलत देण्याची तयारी देण्याबाबत पे. हायझनहॉवर आणि हेरॉल्ड मॅकमिलन यांचे एकमत झाल्याचे प्रकट करण्यात आले आहे. मॅकमिलन आणि हॉवर यांच्या संयुक्त पत्रकांत ही घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकांत म्हटले आहे की, ही योजना सादर करताना अणुचाचण्या शोधण्याच्या पद्धतीच्या संशोधन कार्यात सामील होण्यासाठी रशियाला विचारणा करण्यात येईल.
हिरे काढण्याचा उद्योग सरकार सुरू करणार
नवी दिल्ली – पन्नाच्या खाणीत हिरे काढण्याचे बरेचसे काम सरकारी व्यवसाय म्हणून सुरू करण्याचे योजिले आहे. याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शोधक योजनाचे काम नॅशनल मिनरल डेव्हलप
कॉर्पोरेशनकडे सोपविले आहे.
दहा परदेशांत हिंदी शिक्षणाची सोय
नवी दिल्ली – इराण, नेपाळ, रशिया, पूर्व आफ्रिका, सिंगापूर, अमेरिका, ब्रिटिश वेस्ट इंडिज, ब्रिटिश गियाना आणि जामिआका या देशांत हिंदी शिकविले जाते अशी माहिती शिक्षण मंत्री डॉ. श्रीमाळी यांनी आज लोकसभेत दिली. ते म्हणाले, 1957 मध्ये तीन भारतीयांना हिंदी शिकवण्यासाठी रशियाला पाठविण्यात आले. भारतीय सांस्कृतिक परिषदेतर्फे कॅनबेरा विभागात काही शिक्षकांना पाठविण्यात आले.
कामगार चळवळीचे नेतृत्व कामगारांनी केले पाहिजे
नागपूर – जयप्रकाश नारायण यांनी राज्य सरकारने उघडलेल्या कामगारविषयक शिक्षण समारंभ प्रसंगी भाषणात म्हटले, कामगार चळवळ भारतात यशस्वी व्हायची असेल तर तिचे नेतृत्व कामगारातून निर्माण झाले पाहिजे. कामगार संघटना म्हणजे काय याचे शिक्षण कामगारांना नसल्यामुळेच सध्या कामगार चळवळ यशस्वी होत नाही.