समुद्रातही कोळशाच्या खाणी आढळल्या!
लंडन, दि. 1 – ब्रिटनजवळील उत्तर समुद्राच्या तळाखाली तेलाचा आढळ झाला त्यास आता अनेक वर्षे झाली. यंदाच तेलासाठी 25 विहिरी या समुद्रात खोदण्यात आल्या. आता या समुद्राखाली कोळशाचेही साठे असावेत असा संभव दिसतो.
ब्रिटनच्या नॅशनल कोल बोर्डाने यंदाच या दृष्टीने केलेल्या खोदकामात स्कॉटलंडच्या ईशान्य किनाऱ्यावरील फोर्थ नदीच्या मुखाजवळील समुद्राच्या तळाखाली 5 कोटी मेट्रिक टन कोळशाचा साठा असावा असे दिसून आले. हा कोळसा कसा काढायचा याबाबत विचार सुरू आहे.
बेकायदेशीर सावकारी विरोधी विधेयक
नागपूर – राज्यातील बेकायदेशीर सावकारीस आळा घालणारे सावकारी कायद्याची कडक अंमलबजावणी करणारे हे विधेयक आहे. सावकारांच्या कागदपत्रांची वॉरंटशिवाय तपासणी करण्याचे अधिकार या विधेयकामुळे मिळणार आहेत.
“मोगरा फुलला’
पुणे – “मोगरा फुलला’ ही कादंबरी अपूर्व असून संत ज्ञानेश्वर यांचे जीवनातील व स्तवता त्यात खऱ्या अर्थाने आहे, असे उद्गार दत्ता बाळ यांनी काढले. संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर सुप्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर यांच्या “मोगरा फुलला’ या कादंबरीबाबत ते भरभरून बोलत होते.