कलंदर : प्रजासत्ताक!

-उत्तम पिंगळे

70 वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना 1950 ते 2019 पर्यंत देशाने अनेक क्षेत्रांत प्रगती केलेली आढळते. या सत्तर वर्षांत अनेक पक्षांची सरकारे येऊन गेली काही एकहाती तर काही आघाडीची. 1947 च्या सुमारास सुमारे साडेबारा टक्क्‌यात असलेली साक्षरता 2011 च्या गणनेनुसार सुमारे 74 टक्के झाली. कित्येक ठिकाणी त्याबाबतच्या दर्जाबद्दलही प्रश्न उभे केलेले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कृषी क्षेत्रात अनेक योजना व नवनवीन तंत्र आल्याने आपण अन्नधान्याच्या बाबातील स्वयंपूर्ण झालेलो असलो तरी शेतीची उत्पादकता खूपच कमी आहे.जपान इस्त्राइल यांच्याकडे अत्यंत कमी भूभाग असूनही काटेकोर नियोजनामुळे तेथे प्रचंड उत्पादन होत असते.

दळणवळण व रस्ते यांच्यामध्ये विलक्षण प्रगती दिसून आलेली आहे व बहुतेक गावे रस्त्याने जोडली गेलेली आहेत.नवनवीन महामार्ग तसेच मोठमोठ्या शहरातील वाहतूक कोंडीसाठी मेट्रो यांसारखे प्रकल्प उभे रहात आहेत. छोटय़ा छोटय़ा विमानतळांना मान्यता मिळत असून यामुळे पर्यटन व्यवसायावर चांगला परिणाम दिसणार आहे. पर्यटन क्षेत्र वेगाने वाढत असून देशातील तसेच परदेशातील व्यक्तीही भारतभ्रमणासाठी उत्सुक दिसतात.विज्ञान व तंत्रज्ञानात तर विक्रमी झेप घेतलेली आहे.

आपण पाहतो की गेल्या वर्षी एकाच वेळी आपण एकशे चार उपग्रह अवकाशात सोडले होते. पहिल्याच प्रयत्नात चांद्रयान मोहीम यशस्वी करून दाखवली. संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्य बाबतीत भारताचा हात कोणीही धरू शकणार नाही.जागतिक बाजारपेठेत या बाबतीत भारत यशस्वी होण्याचे कारण म्हणजे भारताची गुणवत्ता व त्या मानाने कमी किंमत.यामुळे भारतातील मुख्य आयटी कंपन्यांना जगभरातून कंत्राटे मिळत असतात.

भारताला त्यामुळे अत्यंत आवश्‍यक असलेले परकीय चलन मिळत असते.विकासाभिमूख अर्थव्यवस्था असताना इंधनाचे महत्व असते. मधले काऴात इंधनाची किंमत प्रचंड वाढल्यामुळे भारताला आता पर्यायी इंधन शोधणे आवश्‍यक आहे याचे मुख्य कारण सुमारे सत्तर टक्के इंधन आपल्यास आयात करावे लागते.संरक्षण क्षेत्रातही आपण हात्यारांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत असून हळूहळू आपल्याकडेही अनेक विविध हत्यारे निर्माण केली जाउ लागली आहेत.

अर्थात असे सर्व होत असताना दुसरी बाजूही पाहणे आवश्‍यक ठरते आज जातीयवाद आरक्षण आदी विषय पुन्हा डोके वर काढत आहेत संतांनी दिलेली सामानतेची शिकवण आपण राजकारणापायी सोयीस्करपणे विसरून जात आहोत.चिनी मालाचा सर्व देशभर सुळसुळाट झाला असून आपण आपल्या देशात कमी किमतीत का निर्माण शकत नाही हा प्रश्न कुणालाच पडताना दिसत नाही. रोजगार हवा तसा निर्माण झालेला नाही.

सहकाराचा मूळ हेतू बाजूला राहून सर्वत्र साखर सम्राट दूध सम्राट शिक्षण सम्राट बोकाळले आहेत व मूळ शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडत नाही.नुकत्यात जाहीर झालेल्या आकडेवारीतून भारताचा एक टक्के लोकांकडे 58 टक्के संपत्ती आहे तर गेल्यावर्षी झालेल्या संपत्तीच्या वाढीतील 73 टक्के लाभ याच श्रीमंत लोकांना मिळालेला आहे.याचा अर्थ आपण पुन्हा भांडवलशाहीकडेच जात आहोत असा निघतो.

पूर्ण भांडवलशाही जशी चांगली नाही तसा पूर्ण समाजवादही चांगला नाही कारण तेथे नवनिर्मितीला स्थान मिळत नाही.आपल्याला दोघांचा सुवर्णमध्य गाठायचा असून आपला देश म्हणजे कल्याणकारी राज्य असावे. पण ताजी आकडेवारी तर आपण भांडवलशाही कडेच जात असल्याचे दर्शवते.

आर्थिक विषमता प्रचंड वाढ झाल्याने त्याचा परिणाम सामाजिक जीवनावर होणार आहे. अजूनही आपण यातून मार्ग काढू शकतो. एकाधिकारशाहीतून बाहेर पडून छोट्या उद्योगांना चालना देऊन स्थानिक रोजगार निर्माण करावा लागेल. तसे न झाल्यास विषमतेचा भस्मासूर पूर्ण देशाच्या सामाजिक एकोप्याला गिळंकृत करण्यास पुढे मागे पाहणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)