नाशिक – गेल्या काही दिवसांपासून तेलाच्या किंमती वाढल्याने चोरट्यांनी आता आपला मोर्चा गोडे तेलाकडे वळवला आहे. नाशिकमधील पेठ रोड येथील एक दुकान फोडून तब्बल पावणेपाच लाख रुपयांचे गोडेतेलाचे डब्बे चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पेठ रोड येथे जे एम ट्रेडर्स नावाचे होलसेल किराणा दुकान आहे. चोरट्यांनी रात्रीच्यावेळी हे दुकान फोडून येथून तब्बल पोवणेपाच लाख रुपये किमतीचे जेमिनी, सनफ्लॉवर, फोरचुन, मुरली अश्या विविध कंपन्यांच्या गोड तेलाचे लिटर आणि किलोचे असे एकूण 125 डब्बे चोरून नेले. तर अन्य देखील काही मालावर चोरट्यांनी हात साफ केला. या संपूर्ण प्रकरणी पंचवटी पोलीस अधिक तपस करत आहे.