नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांना छापेमारी दरम्यान तबलिगी जमातींशी संबंधित कागदपत्रे सापडली आहेत. त्यातून बरच काही उघड होणार आहे. अंमलबजावणी संचानालया (ईडी) ने दिल्ली पोलिसांना छापेमारी दरम्यान मिळालेली कागदपत्र मागितले आहेत. छापेमारी दरम्यान दिल्ली पोलिसांना तबलिगी जमातीच्या व्यवहारासंदर्भात काही कागदपत्रे आढळून आली होती.
या कागदपत्रांवर कोणाचे हस्ताक्षर हे तपासण्यासाठी तबलीगी जमातमधील काही अधिकाऱ्यांच्या हस्ताक्षरांचे नमुने घेण्याची तयारी सुरू आहे. या प्रकरणात ‘ईडी’ला मणी लॉन्ड्रिंगची शंका आहे. परदेशी आणि देशातील अनेकांकडून पैसे मिळवल्याचा अंदाज आहे. तसेच उर्दूमध्ये लिहिलेल्या रजिस्टरमधूनही अनेक महत्त्वाचे खुलासे होत आहेत.
दिल्ली पोलिसांनी तबलीगी जमात आणि मौलाना साद यांच्यावर गुन्हा दाखल आहे. कलम ३०४ नंतर आता कलम ३०८ चा देखील एफआयआरमध्ये समावेश करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या आणि कोरोना विषाणूमुळे ग्रस्त झालेल्या लोकांच्या बाबतीत कलम ३०४ लागू करण्यात आला आहे.
तर, जे रुग्ण कोरोना पासून बरे झाले आहेत त्यांच्यावर ३०८ कालमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत कलम १८८, २७०, २७१, ३३६, ३०८,३०४, आणि कलाम १२० (साथीचा रोग) अधिनियम कलमानुसार एफआयआर नोंदवला आहे. या कामांतर्गत आरोपीला सहज जमीन मिळवता येत नाही तसेच शिक्षा होण्याचा कालावधीसुद्धा जास्त आहे.