मुंबई – माजी केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते आनंद अडसुळ यांना ईडीने सोमवारी समन्स जारी केले आहेत. हे समन्स त्यांना बजावण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या ठिकाणांना भेट दिली.
दरम्यान 74 वर्षीय अडसुळ यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना रूग्णालयात नेण्यात आले आहे असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. मुंबईतील एका सहकारी बॅंकेत झालेल्या 980 कोटी रूपयांच्या घोटाळा प्रकरणात ईडीने अडसुळ यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने अडसुळ यांच्या विरोधात मनिलॉंड्रिंगची केस दाखल केली आहे. स्वत: आडसुळ या बॅंकेचे चेअरमन असताना हा घोटाळा झाला आहे.
अडसुळ हे अमरावती लोकसभा मतदार संघातील माजी खासदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा नवनीत राणा यांनी पराभव केला आहे.