प्रफुल्ल पटेल यांना ईडीचे समन्स

नवी दिल्ली: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचा सहकारी दिवंगत इक्‍बाल मिर्ची याच्या बेकायदेशीर संपत्तीशी संबंधित “मनी लॉंडरिंग’ प्रकरणाच्या चौकशीप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.

“युपीए’ सरकारच्या राजवटीत माजी केंद्रीय मंत्री असलेले पटेल यांना 18 ऑक्‍टोबरला मुंबईत उपस्थित राहण्यास सांगितले गेले आहे. पटेल आणि त्यांची पत्नी आणि मिर्चीची पत्नीने वाढवलेल्या रिअल इस्टेट कंपनीतील कराराच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) “प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग’ कायद्यांतर्गत पटेल यांचे निवेदन नोंदवणे अपेक्षित आहे. विमान वाहतुक घोटाळ्याशी संबंधित आणखी एका “मनी लॉन्डरिंग’ प्रकरणात “ईडी’ने पटेल यांची या आधीच चौकशी केली आहे.

ईडी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पटेलच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडने 2006-07 मध्ये “सीजे हाऊस’ नावाची इमारत बांधली आणि तिचा तिसरा आणि चौथा मजला मिर्चीची पत्नी हजारा इक्‍बाल यांना हस्तांतरित करण्यात आला. ज्या जागेवर इमारत बनविली गेली ती मिर्चीची असल्याचे सांगितले जाते. “मनी लॉंन्डरिंग’, ड्रग्सची तस्करी आणि खंडणीखोरीच्या गुन्ह्यांमधून ही जमीन विकत घेण्यात आल्याचा तपास अधिकाऱ्यांचा दावा आहे.

या करारात काही चूक नसून, हा व्यवहार स्वच्छ आणि पारदर्शक असल्याचे मालमत्तेच्या कागदपत्रांमधून पटेल आणि त्यांच्या पक्षाने स्पष्ट केले आहे. 2010 मध्ये लंडनमध्ये मरण पावलेल्या मिर्चीच्या दोन साथीदारांना “ईडी’ने अटक केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)