नवी दिल्ली – अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने तिच्यावर बजावण्यात आलेले ईडीचे समन्स पुन्हा धुडकावले आहे. तिच्यावर बजावण्यात आलेले हे तिसरे समन्स होते. दोनशे कोटी रूपयांच्या मनिलॉंड्रिंग प्रकरणात तिच्यावर हे समन्स बजावण्यात आले होते.
आज तिला ईडीसमोर हजर राहणे आवश्यक होते, पण आपल्या पुर्वनियोजित कामामुळे आपल्याला तिकडे हजर राहणे शक्य नाहीं असे तिने ईडीला कळवले आहे. 36 वर्षीय जॅकलिन या आधी ऑगस्ट महिन्यात ईडीपुढे हजर राहिली होती.
या मनि लॉंड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री लिना पॉल हे प्रमुख आरोपी आहेत. त्यांच्या पैशाच्या व्यवहाराचे धागेदोरे जॅकलिन पर्यंत गेल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. याच प्रकरणात अभिनेत्री आणि नृत्यांगना नोहा फतेही हिने गुरूवारी ईडीपुढे आपले म्हणणे सादर केले आहे.