इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणी ईडीकडून ‘राज कुंद्रा’ यांना समन्स

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा चांगलेच अडचणीत सापडले आहेत. इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणात राज कुंद्रा यांना ईडीने समन्स बजावले आहेत. अंडरवर्ल्डसोबत राज कुंद्रा यांचे संबंध असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. इक्बाल मिर्ची या कुख्यात गुंडासोबत राज कुंद्रा यांनी व्यावसायिक करार केल्याचा संशय ही ईडीने व्यक्त केला आहे. यासाठीच राज कुंद्रा यांची ४ नोव्हेंबरला चौकशी केली जाणार आहे.

दरम्यान, इक्बाल मिर्चीचा साथीदार रंजीत सिंघ बिंद्रासोबत राज कुंद्रा यांनी हा व्यावसायिक करार केल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. रंजित बिंद्रा हा इक्बाल मिर्चीसाठी काम करतो असा आरोप त्याच्यावर आहे, त्यामुळेच राज कुंद्रा यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे, मात्र राज कुंद्रा यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तपशीलांची पडताळणी करत असताना ईडीला राज कुंद्रा यांच्यासंदर्भातली माहिती आढळली. कारण या पडताळणीत इसेन्शिअल हॉस्पिटॅलिटी लिमिटेड कंपनीचे नाव समोर आले. ही कंपनी राज कुंद्रा यांच्या मालकीची आहे तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी या कंपनीची संचालक आहे. दरम्यान २०११ मध्ये मी एक जमीन आणि कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना विकली होती. एअरपोर्टच्या जवळ असलेल्या या जमिनीचे सगळे कागद माझ्या सीएने तपासले आहेत. त्यानंतर या कंपनीशी माझा काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरण राज कुंद्रा यांनी दिले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.