बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला ईडीचे समन्स; 200 कोटी वसुली प्रकरणात होणार चौकशी

मुंबई – 200 कोटी वसुली प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. अभिनेत्रीला आज अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी बोलावले आहे. याच प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसलाही ईडीने समन्स बजावल्याचे वृत्त आहे.

नोरा फतेहीला मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत ईडीने समन्स बजावले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दिल्लीच्या तिहार कारागृहात बंद असलेल्या सुकेश चंद्र शेखरने एका व्यावसायिकाकडून एका वर्षात 200 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने नोरा फतेहीला समन्स बजावले आहे. असे म्हटले जात आहे की, सुकेशने नोराला इतरांप्रमाणे याप्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, याआधी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि अभिनेता सोनू सून ईडीच्या जाळ्यात अडकले होते. आता ईडीच्या जाळ्यात नोरा आडकली आहे. पण याप्रकरणी नोराकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.